जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

रिफाइंड धान्यामुळे वाढतोय हृद्यविकाराचा धोका, कॅनडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दावा….

परिष्कृत(रिफाइंड) धान्यावरील नवीन संशोधन इशारा देणारे आहे. संशोधनानुसार, मैदा आणि ब्रेडसारख्या परिष्कृत धान्यांमुळे हृदयरोग होतो आणि मृत्यूचा धोका २७ टक्क्यांनी वाढतो. जर आपण असा आहार दररोज केला तर हृदयविकाराचा धोका ३३ टक्के आणि स्ट्रोकचा धोका ४७ टक्क्यांपर्यंत वाढतो. कॅनडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.

उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील १.३७ लाख लोकांवरील १६ वर्षांच्या संशोधनात असे निष्कर्ष आलेत की ते किती हानी पोहचवतात. धान्य संशोधन तीन भागात विभागले गेले होते. परिष्कृत धान्य, संपूर्ण धान्य आणि पांढरे तांदूळ. संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की पांढरे तांदूळ आणि संपूर्ण धान्य लोकांमध्ये कोणतीही हानी पोहोचवू शकत नाहीत, परंतु परिष्कृत धान्यांचा परिणाम दिसून आला. आहारात परिष्कृत धान्यांचे प्रमाण कमी करून मृत्यू आणि रोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो.

रिफाइंड

धान्यापासून उत्पादन तयार करण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे त्याचे फायबर आणि पोषकद्रव्य नष्ट होते. या उत्पादनांना परिष्कृत धान्य म्हणतात. जसे मैदा, त्यातून तयार केलेली ब्रेड, पास्ता, एडेड साखर.

दुसरे संशोधन असे म्हणतात की प्रक्रियेनंतर तयार केलेल्या या गोष्टींचे सेवन केल्यास पोषण शरीरात पोहोचत नाहीत. जगभरात विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परिष्कृत धान्यात अत्यल्प फायबर असल्यामुळे हे सहज पचते. परिणामी, एखादी व्यक्ती भुकेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच ते लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात.

गव्हाच्या भाकरी ऐवजी, बाजरी, ज्वारी किंवा नाचणीया पीठाची बनलेली भाकर खा. ते हृदयासाठी अधिक फायदेशीर आहेत.जरी आपण तळलेल्या आणि गोड गोष्टी पूर्णपणे टाळत नाहीत तरी कमी करा.नेहमी आपल्या भुकेपेक्षा २०% कमी खा.या काही बाबींचा विचार केल्यास दैनंदिन जीवन सुधारेल आणि आपले शरीर निरोगी राहील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

मल्लिका शेरावतचे साडीतील हॉट फोटो व्हायरल,पहा फोटो…

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

 

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here