जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

पाकिस्तानात ५ जणांचा बकरीवर रेप, पाक पंतप्रधान इम्रान खान होतोय ट्रोल..!


पाकिस्तानात लैंगिक विकृतीचा एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या ओकारामध्ये  एका बकरीवर बलात्कारकरुन तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एका मजुराने ही बकरी पाळली होती. पाचही आरोपी बकरीला नजीकच्या कपाऊंडमध्ये घेऊन गेले व त्या मुक्या जनावरावर बलात्कार केला.

बकरीची हत्या करण्याआधी आरोपींनी तिचा छळ केला. हे क्रूर कृत्य केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. स्थानिकांच्या हवाल्याने काही माध्यमांनी वृत्त दिले आहे. पाकिस्तानात या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बकरी

बकरीवरील बलात्कारच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर युझर्सनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना काही प्रश्न विचारले आहेत. बकरीने सुद्धा पेहरावामध्ये सभ्यता पाळायला पाहिजे होती का? असा सवाल एकाने विचारला आहे.

Advertisement -

इम्रान खान यांनी काय विधान केले होते?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विशेष म्हणजे महिलांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे ते आता दुसऱ्यांदा वादात सापडले आहेत. देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांसाठी महिलांचे कपडेच जबाबदार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. विशेष म्हणजे मागे एकदा अशाच कपड्यांवरुन केलेल्या वक्तव्यांमुळे ते अडचणीत सापडले होते. यावेळी मात्र, त्यांनी पुन्हा कपड्यांवरुनच केलेलं वक्तव्य चर्चेस पात्र ठरलं आहे.

पाकिस्तानमध्ये महिलांवरील आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरुनच पंतप्रधान इम्रान खान यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ‘अ‍ॅक्सिओस ऑन एचबीओ’ ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, जर एखादी महिला खूपच तोकडे कपडे परिधान करत असेल तर त्याचा पुरुषावर परिणाम होणारच. ते रोबोट्स नाहीयेत. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here