जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अभिनेत्री राणी मुखर्जीने खरेदी केले आलिशान घर, किंमत जाणून उडतील होश..


बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले आहे, ज्याची किंमत 7 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. हे आलिशान घर रुस्तमजी पॅरामाउंट सोसायटीमध्ये आहे.

या सोसायटीमध्ये अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत. असे सांगितले जात आहे की राणी मुखर्जीचे हे आलिशान घर 22 व्या मजल्यावर आहे, जिथून समुद्राचे दृश्य दिसते.

रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये घर खरेदी करणारी राणी मुखर्जी 5 वी सेलिब्रिटी बनली आहे. तिच्या आधी दिशा पटानी, टायगर श्रॉफ, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनीही येथे घर खरेदी केले आहे.

राणी मुखर्जी

Advertisement -

राणी मुखर्जी इंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाते. अलीकडेच ती तिच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे. हार्दिक आणि कृणाल पंड्या यांनी एकत्र राहण्यासाठी 3838 चौरस फूट 4+4 बीएचके अपार्टमेंट एकाच सोसायटीत खरेदी केले होते, ज्याची किंमत 28-30 कोटी रुपये आहे.

राणी मुखर्जीचे हे आलिशान घर 22 व्या मजल्यावर असेल. जिथून समुद्राची सुंदर दृश्येही दिसतात. अभिनेत्रीला या घरात दोन कार पार्किंगची जागाही मिळाली आहे. हे राणीचे घर 3545 स्क्वेअर फूट कार्पेटमध्ये बांधलेले आहे, जे 4 प्लस 3 बीएचके आहे.

राणी मुखर्जीच्या या आलिशान घराची किंमत 7.12 कोटी रुपये सांगितली जात आहे. रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये आउटडोअर फिटनेस स्टेशन, कृत्रिम रॉक क्लाइंबिंग एरिया, स्विमिंग पूल, गेमिंग एरिया, चिल्ड्रेन प्ले एरिया आणि मिनी थिएटर यासारख्या सुविधा आहेत. ही सोसायटी खार, वांद्रे जवळ आहे.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here