जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

राखी सावंतला व्हायचय आई, म्हणाली नवरा आला तर आला नायतर….


अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ‘बिग बॉस 14’पासून राखी ‘मनोरंजन क्वीन’ बनली आहे. तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राखीने ‘बिग बॉस 14’च्या घरामध्ये तिच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. घरात असताना एकदा ती म्हणाली होती की, तिने तिचे एग्ज फ्रीज केले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत राखीने म्हटले आहे की, आता तिला आई बनण्याची इच्छा आहे

बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली की, तुम्हाला जास्त काळ काम करायचे असेल, तर तुमचे एग्ज फ्रिज करणे, ही चांगली कल्पना आहे. स्त्रियांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांना गर्भधारण करण्यात मोठी अडचण येते. एका विशिष्ट वयानंतर स्त्रीला आई बनणे अवघड होते. आपल्याला बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम करायचे असेल आणि भविष्यात आपल्याला मुल हवं असेल, तर आपण एग्ज फ्रिज करू शकता.

राखीला व्हायचेय आई!

राखी सावंत

राखी पुढे म्हणाली की, आता ती आई होण्यासाठी तयार आहे. राखी म्हणाली, ‘हो मला आई व्हायचं आहे. आता वेळ आली आहे. कारण, मी माझे एग्ज फ्रिज करून ठेवले आहेत, म्हणून मी निर्धास्त काम देखील करू शकते. जर माझा नवरा आला तर ते चांगलेच आहे, अन्यथा भविष्यात मलाच काही निर्णय घ्यावा लागेल.’

Advertisement -

सलमान खानला समर्थन

सध्या अभिनेता सलमान खान आणि केआरके चर्चेचा एक भाग बनले आहेत. केआरकेने सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाचा अत्यंत खराब रिव्ह्यू केला. त्यानंतर सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. केआरके सोशल मीडियावर सलमानबद्दल थेट बोलत होत. त्यानंतर राखी सावंत सलमानच्या समर्थनार्थ पुढे आली. राखी म्हणाली होती की, केआरके एक नंबरचा लबाड आहे. तो सगळं खोटं बोलतो. तो बोलतो की मी अमेरिकेतून पँट विकत घेतो, पण तो हे सर्व लोखंडवाला येथून खरेदी करतो.’

राखी सावंतचे ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री’ हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे सुपरहिट ठरले आहे. गाणे सुपरहिट झाल्यावर राखीनेही सेलिब्रेशन केले. राखी सावंत काही काळापूर्वी ‘इंडियन आयडॉल 12’ या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये गेली होती. जिथे तिने लावणी करून सर्वांनाचा आश्चर्यचकित केले होते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here