आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा पहिला क्रश होता राहुल द्रविड, फक्त द्रविडला पाहण्यासाठी भावासोबत पहायची क्रिकेटचे सामने..!


भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने टी-20 मालिकेत क्लीन स्वीप करून द्रविड युगाची सुरुवात केली आहे. द्रविड पुढील दोन वर्षे संघाचा प्रशिक्षक असेल. यापूर्वी त्याने श्रीलंका दौऱ्यात संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते, मात्र आता ते पूर्णवेळ संघाचे प्रशिक्षक बनले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या नऊ वर्षानंतरही द्रविडचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ सामान्य चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील काही सौंदर्यवतींनाही त्याचे वेड लागले आहे. या यादीत बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्या नावाचाही समावेश आहे, जिने द्रविडला तिचे पहिले प्रेम म्हटले आहे.

राहुल द्रविड

रिचा चढ्ढानी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की ती आता नियमित क्रिकेट पाहत नाही, परंतु कधीकधी फक्त द्रविडला पाहण्यासाठी तिच्या भावासोबत सामने पाहायची. चड्ढा म्हणाले की, द्रविड निवृत्त झाल्यावर तिने क्रिकेट पाहणे बंद केले होते. चढ्ढा म्हणाली, “माझ्या लहानपणी मी क्रिकेटचा फार मोठा चाहता नव्हते. होय, माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. एक काळ असा होता की आम्ही टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघायचो. मला राहुल द्रविडला खेळताना बघायला खूप आवडायचं. त्याने संघ सोडल्यानंतर मी क्रिकेट फॉलो करणे बंद केले. माझे पहिले प्रेम राहुल द्रविड आहे.

Advertisement -

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here