जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

Mpsc परीक्षा पास होण्यासाठी कोणती कोणती तयारी करावी लागते? घ्या जाणून…


MPSC साठी अभ्यास करताना जी ऊर्मी मनामध्ये असते, ती आपल्या आत्मविश्‍वासातुन दिसून येत असते.यशाची वाटचाल  करणारे आपल्यासारखे अनेक विद्यार्थी यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा असूनही, आपल्या तळहाती  अपयश उतरताना आपण बघत असतो.परीक्षा

मात्र  विद्यार्थ्यांकडे  आत्मविश्‍वास, योग्य मार्गदर्शन, संकल्प, समर्पण, शिस्त असते  व आपण पाहिलेल्या ध्येयाप्राप्ती विषयी कालमर्यादा किंवा वेळेचे बंधन असेल तर  निश्‍चितपणे प्रथम अथवा कमीत कमी दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होता आलेच पाहिजे. आपल्याला नक्की  काय करायच आहे, कशाचा /कोणता अभ्यास करायचा आहे.

अभ्यासाची नेमकी पद्धत कोणती आहे , स्वतःच्या चुका सुधार करता याव्यात व वेळेमध्ये कशी सुधारणा करता आली पाहिजे हे ज्याला जमते, त्या विद्यार्थ्यांची  अभ्यासाची तयारी यशस्वी होताना दिसते.

मात्र हे ध्येय गाठण्यासाठी बरिच पाराकष्ट सोसावे लागणार आहेत. शिवाय स्वतःमधील क्षमता , गुण, उणिवा  समजून  घ्यावे लागणार आहे व त्यावर उपाय नियोजनही कराव लागणार आहे, हे आधी  लक्षात घ्या. MPSC परीक्षेची तयारी करताना पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेचा कॉमन अभ्यासक्रम वेगला करून घ्यावा.

Advertisement -

जो विषय अवघड वाटत आहे  अश्या विषयाकड दुर्लक्ष न करून त्याची  जास्त तयारी करावी. एखाद्या टॉपिक  अभ्यास झालेला आहे, असे आपल्याला  वाटते  तर अशा टॉपिक वरचे वेगळे  प्रश्न सोडवण्यासाठी घ्या. यावरून तो टॉपिक आपणास किती आत्मसात  झाला आहे हे लक्षात येईल.

परीक्षा

परीक्षेची तयारी करताना आधी परीक्षेचे स्वरूप माहिती करून घेणे गरजेचे असते. त्याच बरोबर परीक्षेची पात्रता अटी माहिती करून घ्याव्यात, परीक्षा पास होण्यासाठी स्मार्ट अभ्यास करणं खुप गरजेचं आहे त्यासाठी स्टडी च योग्य नियोजन करावं, कोणत्या पदासाठी कोणती पुस्तके उपयुक्त आहे ते बघावीत..त्याच बरोबर बेसिक ज्ञान असावे.

रोज न्यूज पेपर वाचावा, चालू घडामोडी वर लक्ष द्यावे.

मित्रांनो, खूप जास्त कष्ट केले की फळ मिळत असते असं नाही , तर त्या कष्टाला विचारांची गरज असावी लागते. यशाची  जोड  असावी लागते. कष्टाला योग्य मार्गदर्शनाची साथ असावी लागते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here