आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शेतकरी वर्गासाठी खुशखबर,सरकार देणार 4000 रुपये, वाचा सविस्तर


आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अनेक योजनांमुळे अनेक शेतकरी वर्गाला अर्थसाह्य होत आहे. मोदी सरकार हे जून महिन्यात देशभरातील शेतकरी वर्गाच्या खात्यात  4000 रुपये पाठवण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकरी वर्गाला याचा लाभ घेता येणार आहे.

शेतकरी

काही महिन्यांपूर्वी च केंद्र सरकार ने या योजनेचा हप्ता शेतकरी वर्गाच्या खात्यामध्ये पाठवला  होता. त्यावेळी शेतकरी वर्गाला केवळ 2000 रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत 9 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंद केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर वर जाऊन एक अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यावर थेट केंद्र सरकार तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करेल.

Advertisement -

4000 रुपये चा हप्ता मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल:-

1) काही शेतकरी वर्गाने गेल्या वर्षी पंतप्रधान सन्मान योजना यात रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा न्हवते झाले. त्यामुळं शेतकरी पंतप्रधान योजनेत नाव नोंदण्यासाठी 30 जून या तारखेपर्यंत मुदत आहे. 30 जून ही नाव नोंदणी ची अंतिम तारीख आहे.

शेतकरी

2)या महिन्या च्या अखेरीस नाव नोंदणी केल्यावर एप्रिल आणि जून चा हप्ता हा जुलै महिन्यात आणि नंतर चा नवीन हप्ता हा ऑगस्ट महिन्यात खात्यावर सोडला जाईल.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत रजिस्ट्रेशन कसे करावे:-

1) पहिल्यांदा pmkisan.gov.in या वेबसाईटवर  जावे.

2)त्यानंतर फार्मर ऑपशन वर क्लिक करा.

3)नंतर new फार्मर रजिस्ट्रेशन करावे.

4)त्यानंतर त्यात माहिती भरून घ्यावी.
अश्या प्रकारे रजिस्टर करावे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here