जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

आयपीएलच्या उर्वरित सामन्यात इयोन मॉर्गन खेळला नाही तर या खेळाडूंना मिळू शकते केकेआरचे कर्णधारपद!


आयपीएल 2021 मध्ये केकेआरच्या संघाचीस्थिती खराब होती आणि कामगिरीही विशेष नव्हती. खराब कामगिरीबद्दल चाहत्यांनीही आवाज उठविला आणि सांगितले की, संघातील कर्णधार बदलण्याची गरज आहे. तथापि हे घडले नाही आणि स्वतःच स्पर्धा मध्यभागी पुढे ढकलण्यात आली. केकेआरच्या टीममध्ये कोरोना विषाणूची काही प्रकरणे आढळली आणि नंतर इतर संघांतील खेळाडूंनाही संसर्ग झाल्याचे आढळले. यानंतर बीसीसीआयला स्पर्धा तहकूब करण्यास भाग पाडले गेले.इयोन मॉर्गन

आता पुन्हा एकदा आयपीएल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयने सप्टेंबर-ऑक्टोबर विंडोमध्ये युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याची भाषा केली आहे. परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल शंका आहे. आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता इंग्लंडचे खेळाडू कदाचित येऊ शकणार नाहीत. इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक श्ले  जिल्स यांनीही आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेच्या अनुषंगाने अन्य स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगितले. जर  इयन मॉर्गन आयपीएलच्या उर्वरित हंगामात खेळायला आला नाही तर केकेआर कडे असे कोणते खेळाडू आहेत जे कर्णधारपद सांभाळू शकतात याबद्दल पाहूया.या लेखात तीन संभाव्य नावांचे वर्णन केले आहे.

आंद्रे रसेल: रसेलकडे कर्णधारपदाचा अनुभव फारसा नसला तरी त्याने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये राजशाही   रॉयल्सचा नेतृत्व केला. तो एक वरिष्ठ खेळाडू असल्याशिवाय संघाला सोबत घेणारा मजबूत अष्टपैलू खेळाडूदेखील आहे. अशा परिस्थितीत त्याला कर्णधारपदी नियुक्त केले जाऊ शकते.

इयोन मॉर्गन

दिनेश कार्तिक: दिनेश कार्तिकचे नाव सर्वात भक्कम मानले जाऊ शकते कारण गेल्या वर्षापर्यंत तो केकेआरचा कर्णधार होता. संघाच्या खराब कामगिरीनंतर मॉर्गनला मध्यभागी आणले गेले. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिक पुन्हा एकदा इयन मॉर्गनच्या जागी कर्णधार बनू शकतो.

पॅड कमिन्स: अनुभवी खेळाडूंबद्दल बोलताना कमिन्सचे नावही त्यात समाविष्ट आहे. केकेआरच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या  कमिन्सलाही ही जबाबदारी दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आजकाल कसिन्स संघाचा कर्णधार कमिन्सकडे देण्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत पॅट कमिन्स यांना केकेआरच्या संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली तर आश्चर्यचकित होऊ नका.

इयोन मॉर्गन

परंतु कमिन्ससुद्धा आयपीएलच्या उर्वरित हंगामात खेळणार का नाही हे आजून स्पष्ट झाले नाहीये. जर कमिन्स खेळण्यास तयार झाला तर तो केकेआरच्या कर्णधार पदाचा प्रबळ दावेदार समजला जाईल.केकेआर संघ आता उर्वरित हंगामात कोणता  कर्णधार निवडतो आणि त्याच्या नेतृत्वात संघ कसी कामगिरी करतो हे पाहने रंजक ठरेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here