सामान्यता ज्यावेळी एखादे व्यक्तीचे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन चालू असते त्यावेळी तो पूर्णपणे शांत असतो कारण त्याला भूल दिलेली असते त्याला काहीच समजत नाही कारण जर भूल दिली नाही तर ते ऑपरेशन खूप दुखू शकते पण आज आम्ही तुम्हाला अशा घटनेबद्धल सांगणार आहोत हे ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल चला तर पाहू.

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

ब्रेन सर्जरी चालू असताना हा व्यक्ती का वाजवत असेल गिटार,जाणून घ्या या मागील कारण


३१ वर्ष वय असणारा बांगलादेश मधील एक संगीतकार ज्याचे नाव तस्कीन अली असे होते, हा एक गीटार वादक आहे पण जेव्हा तो गिटार ऑपरेट करायचा त्यावेळी त्याची बोटे नीट काम करत न्हवती. या या समस्येवर मात करण्यासाठी अलीने बंगळुरूच्या महावीर जैन रुग्णालयात मेंदूची सर्जरी करण्याचे ठरवले.

ज्यावेळी त्याची सर्जरी चालू होती त्यावेळी तो गिटार वाजवत होता तसेच डॉक्टरांनी त्याला एक फोन दिला तो सुद्धा त्याच्या बोटाने ऑपरेट करत होता.

खर ते गेल्या अनेक वर्षांपासून अली या आजाराशी लढत होता त्यावेळी बांगलादेशमध्ये या आजारावर उपचार नव्हता.

Advertisement -

गिटार

अलीला असे समजले की भारतामध्ये त्याच्या सारखाच एका आजार असलेला व्यक्ती होता त्याचे नाव अभिषेक प्रसाद होते त्याचे ऑपरेशन बंगळूर मध्ये झाले. त्यानंतर अलीने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला, अली खूप टेन्शन मध्ये होता कारण त्याच्या हाताची बोटे चांगल्या प्रकारे ऑपरेट होत न्हवती.

अली एक कॉम्प्युटर इंजिनिअर आहे पण २००७ मध्ये त्याला गिटार चालवण्याचा नाद लागला, २०१३ मध्ये त्याच्या उजव्या हातचे २, ४ आणि ५ नंबरचे बोट नीट काम करत न्हवते जे हळू हळू दुसऱ्या बोटांमध्ये सुद्धा पसरू लागले. त्याची बोटे काम करत नसल्याने त्याचे गिटार वाजवणे बंद पडू लागले.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here