जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

परवेझ मुशर्रफ यांनी महेंद्रसिंग धोनीच्या लांब केसांवर फिदा झाले, तेव्हा त्यांनी दिला होता ‘हा’ सल्ला


2006 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौर्‍यावर गेला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 1-0 ने विजय मिळविला होता, परंतु त्यानंतर भारत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असताना परत जोरदार मुसंडी मारत  मालिका 4-1 ने जिंकली. या मालिकेत युवराज सिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले असले तरी युवा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनीविषयी अधिक चर्चा झाली. त्यावेळी धोनीचे केस खूप लांब होते आणि तो आपल्या चपळ फलंदाजीमुळे खूप लोकप्रिय झाला. परिस्थिती अशी होती की, त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष असलेले परवेझ मुशर्रफ यांनीही धोनीच्या केसांचे कौतुक केले आणि त्याला एक विशेष सल्ला दिला.

मालिकेचा तिसरा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने या सामन्यात आठ गडी राखून 288 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 47.5 षटकांत पाच गडी राखून 292 धावा केल्या आणि सामना पाच विकेट्सने जिंकला. धोनीने 46 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या आणि सामनावीर म्हणून निवडण्यात आले.  सचिन तेंडुलकरने 95 आणि युवराज सिंगने नाबाद 79 धावा केल्या. धोनीच्या फलंदाजीच्या बळावरच हा सामना भारताने जिंकला.

परवेझ मुशर्रफ

Advertisement -

सामन्यानंतरच्या पोस्ट मॅच प्रेजेंटेशन दरम्यान पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ देखील उपस्थित होते. धोनीच्या खेळीवर मुशर्रफ यांनी कौतुकाचा वर्षाव केला. इतकेच नव्हे तर मुश्रीफ यांनी धोनीच्या मोठ्या केसांची स्तुती केली आणि सांगितले की, सामन्यादरम्यान मी मैदानावर अशी काही पोस्टर्स पाहिली आहेत ज्यात लोक तुला केस कापण्याचा सल्ला देत होेते. तेव्हा मुशर्रफ म्हणाले, ‘धोनी, माझ्या मते तुम्ही केस कापू नयेत. लांब केसात खूप छान दिसता.’

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here