क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

पाकिस्तानच्या बाबरला हरवून पंकज अडवाणीने जिंकले २४ वे जागतिक विजेतेपद


भारताच्या स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणीने दोहा मध्ये झालेल्या ‘आयबीसएफ-६ रेड स्नूकर विश्व कप’ चा जागतिक विजेतेपदाचा किताब जिंकला आहे. अंतिम फेरीत त्याने पाकिस्तानच्या बाबर मसिह ला ७-५ असं हरवत २४ वे जागतिक विजेतेपद पटकावले. त्याच्या आधीच्याच आठवड्यात पंकजने त्याचे ११ वे आशियाई विजेतेपद पटकावले होते.

पंकजने पहिल्या फ्रेम मध्ये ४२-१३ असा स्कोअर करत आघाडी घेतली होती. पण बाबरने पुढची फ्रेम ३८-१४ अशी जिंकत स्कोअरची बरोबरी साधली. पंकजने पुढच्या दोन फ्रेम जिंकत ३-१ अशी आघाडी कायम राखली.

Pankaj Advani

त्या पुढची फ्रेम मात्र बाबरने जिंकत पंकजच्या आघाडीला लगाम लावला. त्या पुढच्या तीन फ्रेम पंकजने जिंकल्या आणि विजेतेपद जिंकण्यासाठी त्याला केवळ एका फ्रेमची गरज होती. बाबरने पुन्हा आपला खेळ सुधारत पुढच्या तीन फ्रेम जिंकल्या आणि त्यांचा स्कोअर ५-६ असा आणून ठेवला. मात्र शेवटची फ्रेम पंकजने जिंकत विजेतेपदाच्या ट्रॉफी वर आपले नाव कोरले.

Advertisement -

आपल्या या विजयावर बोलताना पंकज अडवाणीने सांगितले, की “मी एखादे स्वप्न जगतोय असं वाटतंय. मी बराच काळ खेळापासून लांब होतो; मात्र या एकामागोमाग मिळालेल्या दोन विजयांनी माझी खेळाबद्दलची भूक आणि माझ्यातली स्पर्धात्मक कौशल्यं कमी झालेली नाहीत, याचीच प्रचिती दिली आहे. परतल्यावर मला बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागणार आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे दोन पदकं जिंकणं हे मी खूपच भाग्याचं समजतो. देशासाठी जिंकलेली दोन पदकं घरी घेऊन जाताना खूप आनंद होत आहे.”


हेही वाचा:

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here