जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

पंजाबमधील हे मंदिर फक्त ४ महिन्यासाठीच सुरु असते, बाकी ८ महिने होते गायब..


आपल्या भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्याच्या सौंदर्याबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्ही ऐकेल आणि पहिले असेल पण आज आम्ही तुम्हाला बाथु ची लडी मंदिरा विषयी सांगणार आहोत ज्यांच्या विषयी तुम्ही ऐकले नसेल

पंजाबमधील जालंधरमधील तालवाडा शहरापासून सुमारे ३४ किमी अंतरावर पोंग डाँम तलावाच्या मध्यभागी एक अद्भुत मंदिर बांधले आहे जे वर्षभरात केवळ ४ महिनेच दिसते उर्वरित काळ हे मंदिर पाण्यात बुडालेले असते.

बाथु कि लडी मंदिराच्या ताकदीचा अंदाज यावरून लावला येत कि गेली ३० वर्षे पाण्यात बुडूनही हे मंदिर अजूनही तसेच आहे .या मंदिराजवळ एक मोठा खांब आहे पोंग धरणाची पाण्याची पातळी जेव्हा खुप जास्त असते तेव्हा मंदिर पाण्याखाली जाते पण या खांबाचा वरचा भाग दिसतो.

मंदिर

Advertisement -

मंदिरातील दगडावर गणेश आणि काली मातेच्या मृती कोरलेल्या आहेत मंदिरात भगवान विष्णू आणि शेषनाग याच्या मूर्ती ही ठेवण्यात आल्या आहेत. बाथु कि लडी मंदिरापर्यंत जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते या मंदिराजवळ एक  बेटं देखील आहे जे रेनसर म्हणून ओळखले जाते रेनसर हे वनविभागाचे गेस्ट हाऊस आहे.

या ठिकाणी पोंग डॅम बनवण्यापूर्वी देश्याच्या कानाकोपऱ्यातुन लोक येथे दर्शनासाठी येत होते आता हे मंदिर पहाण्यासाठी मार्च ते जून दरम्यानच पर्यटक येतात.असे मानले जाते कि पांडवांनी त्रेता युगा पूर्वी त्यांच्या वनवासात येथे आश्रय घेतला होता आणि भगवान शंकराची पूजा करण्यासाठी हे मंदिर बांधले.

हे मंदिर ८ मंदिराच्या मालिकेत बनवले आहे आणि तो बाथु नावाच्या दगडांनी बांधले गेले आहेत म्हणूनच या मंदिराचे नाव बाथु कि लाडी आहे.


=

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here