जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सोलापूरची उबदार मऊसूत गोधडी सातासमुद्रापार


सोलापूर –  काही वर्षांपूर्वी जुने कपडे आणि आई-आजीच्या साड्यांपासून घरोघरी महिला, थंडीच्या दिवसात उबदारपणा देणार्‍या मऊसूत गोधड्या घरोघरी बनवायच्या. पावसाळ्याच्या दिवसांत घरकाम झाले की महिला आपल्या फावल्या वेळेत नक्षीदार गोधड्या तयार करायच्या. आई-आजीची कलाकुसर दाखवणाऱ्या या गोधडीनं आज आधुनिक स्वरूप घेतलं असून तिचं आज ‘क्विल्ट’ या रूपात नामकरण झालंय. याच ‘क्विल्ट’ला नवलाईने सजवून एका महिलेने सातासमुद्रापार पोहोचवले. पल्लवी भोपळे असं या महिलेचं नाव असून त्यांनी सोलापूरच्या उबदार मऊसूत गोधडीला म्हणजेच ‘क्विल्ट’ला देशविदेशात पोचवले आहे.

सोलापूर शहराच्या मजरेवाडी या परिसरात राहणार्‍या पल्लवी भोपळे यांना भरतकाम, विणकाम करण्याची प्रचंड आवड. मूळच्या नळदुर्गच्या असलेल्या पल्लवी यांनी एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतलं. लग्नानंतर त्यांना आपल्या छंदाला वेळ देता येत नव्हता. दीड वर्षापूर्वी मार्च 2020 साली अचानक कोरोनामुळे शहरात लॉकडाउन लागू करण्यात आला. या काळात त्यांना प्रचंड वेळ मिळाला. हा वेळ त्या गोधडी शिवण्यासाठी सत्कारणी लावू लागल्या. दरम्यान, याच गोधडीला त्यांनी आधुनिक स्वरूप देण्याचा विचार केला. गोधडी शिवण्याची ही कला त्यांच्या आजी पद्मावती सुरवसे यांच्याकडून बालपणी शिकून घेतल्या होत्या.

सध्या बाजारात ‘क्विल्ट’ला देश-विदेशात प्रचंड मागणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणून त्यांनी क्विल्ट कशी बनवतात याचा अभ्यास केला. स्वत; ची डोकॅलिटी लढवत अाणि आपल्या बहिणीचा सल्ला घेऊन ‘क्विल्ट’ बनवायला सुरुवात केली.

पल्लवी अाणि त्यांची बहीण स्वप्नाली डिझाइन तयार करून ते क्विल्ट हाताने किंवा मशीनचा वापर करुन गोधडी शिवू लागल्या. टाक्यांमधून टाके सुबकपणे एकमेकांत गुंफून, आकर्षित रचना करून, विविध रंगाचे कापड जोडून, पांढरा कापूस वापरुन, नक्षीदार जोडणी करून आकर्षक गोधडी तयार केल्या. तयार केलेली गोधडी सुरवातीला त्यांनी जवळपासच्या नातेवाईकांना आणि परिचयातल्या लोकांना दाखविले.

Advertisement -

गोधडी

८१-९३ इंचच्या नक्षीदार असलेल्या या गोधड्या सर्वांना आवडू लागल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना गोधड्यांचे प्रदर्शन भरवण्याचा सल्ला दिला. या गोधड्याचे दोन प्रदर्शने पुण्यात तर एक घरीच सोलापुरात भरवले. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. साडेतीन हजारापासून ते आठ हजार रूपये किंमतीच्या जवळपास ५० ते ६० गोधड्या विकल्या गेल्या.

काही लोकांनी खरेदी करून त्या आपल्या परिचयातल्या लोकांना देशविदेशात पाठवून दिले. पल्लवी आणि स्वप्नाली या दोन बहिणींनी सुरू केलेल्या या व्यवसायाला आता चांगलीच उभारी मिळत आहे. सोलापूरची ही “गोधडी’ नवलाईने सजून विदेशातही आपल्या उबदारपणाने चांगलाच भाव खात आहे.

महिलांना रोजगारवाटा निर्माण झाल्या-पल्लवी भोपळे

विविध कलाकुसर तयार करण्याचा माझा छंद अाहे. याच छंदाला आज मी व्यावसायिक स्वरूप दिले. कोरोनाकाळात क्विल्ट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. याचे मार्केटिंग माझे पती अश्विनकुमार भोपळे यांनी केले. गोधडीच्या माध्यमातून महिलांना चांगले आर्थिक उत्पन्नही मिळू लागले आहे.

यातून महिलांना रोजगारवाटा निर्माण झाल्या आहेत. हा व्यवसाय अनेक महिलांना सक्षमीकरणाकडे घेऊन जाणारा ठरला आहे. महिलांनी हातावर शिवलेल्या गोधड्यांना देश-परदेशात ही चांगलीच मागणी वाढली आहे. ‘व्हिवर बर्ड क्विल्ट’ नावाचा एक ब्रॅण्ड बाजारात नावारूपास येत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here