अन. पाकिस्तानच्या मंत्र्याने चक्क दाताने फीत कापत केले दुकानाचे उद्घाटन,पहा मजेदार व्हिडीओ..


पाकिस्तानमध्ये लोकशाही म्हणजे एकप्रकारे थट्टाच समजली जाते. पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी हे वेळोवेळी सिद्ध देखील केलं आहे. पाकिस्तानमधील वेगवेगळी व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी चांद नबाव या पाकिस्तानी रिपोर्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ सध्या प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कारागृहमंत्री फयाज अल हसन चोहान यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांनी स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. एका दुकानंचं उद्धाटन करण्यासाठी मंत्र्यांना आमंत्रण दिलं जातं. मंत्री उद्धाटनाला आले. मंत्र्यांच्या स्वागत केलं गेलं. त्यानंतर मंत्री महोदय उद्धाटनाची फीत कापण्यासाठी पुढे आले. मंत्र्याच्या हातात कात्री दिली गेली.

मंत्र्याला दिली गेलेल्या कात्रीची धारच नव्हती. त्यामुळे मंत्र्याला फीत कापता आली नाही. त्यानंतर मंत्री दाताने फीत कापू लागले. तरीही त्यांना फीत कापता आली नाही. त्यानंतर त्यांनी आणखी जोर लावला. अखेर मंत्र्याने करून दाखवलं. त्यांनी दाताने फीत कापली. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या समर्थकांनी टाळ्या वाजवत त्यांचं कौतूक केलं.

दरम्यान, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे. मंत्र्याच्या या कारनाम्यामुळे नेटकरी फयाज अल हसन चोहान यांची मस्करी करताना दिसत आहे. तर काहीजण त्यांची स्तुती देखील करत आहेत.

Advertisement -

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here