जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

‘पोटभर खा, इच्छा असेल तेवढे बिल द्या’ या तत्वावर सोलापूरचा हा गृहस्थ गेल्या २७ वर्षापासून हॉटेल चालवतोय !


एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता, जेवण केले की, खुर्चीवरून उठण्याअगोदरच तुमच्या समोर बिल ठेवलं जाते. मात्र, याला सोलापुरातील एक हॉटेल अपवाद ठरत आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला कशाही प्रकारचेही बिल दिले जात नाही, तुम्ही स्वइच्छेने जे द्याल ते स्वीकारले जाते. इतकंच नाही तर तुम्ही पैसे दिले नाहीत, तरीही चालते. जिल्ह्यांतील अक्कलकोट तालुक्यामध्ये  शावळ हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल गाव. याच गावात ‘श्री सिद्धलिंग’ नावाचे हॉटेल. या हॉटेलात गेल्या 27 वर्षांपासून निस्वार्थ भावाने सेवा दिली जाते.

हॉटेल

शिवपाद किणगे हे 70 वर्षीय गृहस्थ हे हॉटेल चालवतात.

या हॉटेलात प्रवेश करताच आपले हात जोडून स्वागत केले जाते.  येथे तुम्हाला चमचमीत मिरची भज्जी, वडा सांबर अाणि चहा हे पदार्थं मिळतात. हॉटेलात मिळणारे पदार्थं रुचकर आणि हवे तेवढे पैशात देऊन कितीही खाता येत असल्याने आपसुकच शिवपाद यांची प्रसिद्धी प्रकाश झोतात आली. हे पदार्थ ते स्वतः बनवतात. शिवपाद यांच्या हाताला असणारी चव यामुळे अन् असंख्य ग्राहक या हॉटेलात येतात.

शिवपाद किणगेंच्या सेवा भावी वृत्तीमुळे साऱ्या पंचक्रोशीत त्यांना किणगे महाराज म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे दिवसभर या हॉटेलात ग्राहकांची रेलचेल असते. ग्राहक या हॉटेलात येतात. मनसोक्त खातात. मात्र, येथे बिल दिले जात नाही. बिल नाही दिले म्हणून तरी ग्राहकांना विचारले जात आहे. ग्राहक स्वतःहून पैसे देतात. शिवपाद ग्राहक जितके पैसे देतात तितकेच आनंदाने स्वीकारतात. पैसे नसतील तरी खाऊन जा असे ते  ग्राहकांना आवर्जून सांगतात.

Advertisement -

हॉटेल

सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे हॉटेल खुले असते. गावात भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे असंख्य मध्यमवर्ग कुटुंबीय या हॉटेलचा लाभ घेतात. शिवपाद दहा वर्षाचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आजीने त्यांचे पालनपोषण केले. सुरुवातीला काही दिवस त्यांनी दुधाचा व्यवसाय केला. पण हा व्यवसाय पुढे त्यांनी बंद केला. त्यानंतर काही दिवस गावातल्या येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना, शाळेतल्या मुलांना पाणी वाटपाचे काम सुरु केले.

कोणताही माणूस जेवणावाचून उपाशी राहू नये. लोकांची सेवा केल्यावर आपल्याला आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीत कमी भासणार नाही. या वृत्तीने ते लोकांकडून हॉटेलचे बिल मागत नाहीत. लोक स्व इच्छेने देतील तेवढेच पैसे ते स्वीकारतात.

शिवपाद यांच्या उदारमतवादी धोरणांमुळे काही सामाजिक संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here