गाणे

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

‘ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट’ गाण्याचा शेठलोकांना लळा, झाले प्रचंड व्हायरल!


प्रत्येक व्यक्तीकडे एक कला असते आणि ही कला मांडण्यासाठी सोशल मिडीया सारखा जबरदस्त प्लॅटफॉर्म आजच्या पिढीला मिळाला आहे. या माध्यमातून एखादा कलाकार सर्वदूर पोहोचू शकतो, याची प्रचिती नुकतीच आली आहे. सध्या सोशल मिडीयावर ‘ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट’ हे गीत प्रचंड व्हायरल होत आहे. संध्या आणि प्रनिकेत या दोन युवा गीत- संगीतकारांनी लिहिलेलं हे गीत उमेश गवळी यांनी गायले आणि ते गाणं आज नॅशनल क्रश झालं आहे. या गीताच्या माध्यमातून आता हे कलाकार घराघरांत पोहोचले आहेत. पडद्यामागे राहिलेल्या या युवा गीतकारांचे गीत आणि संगीत लोकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे.

गाणं ऐकताच पाय थिरकायला लावणारे हे गीत आज प्रत्येकाच्या ओठावर आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस सर्वत्र याच गाण्याची चर्चा आहे. अवघ्या दोनच दिवसांत हे गीत त्यांनी लिहून पूर्ण केले. कोरोनाकाळत मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणारं हे गीत आहे. यूट्यूबवर हे गीत अपलोड करताचं अवघ्या चारच दिवसांत या गीताने चार मिलियन वीव्हर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्याचा जमाना सोशल मिडीयाचा. अनेकजण आपले फोटो टाकून त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देत ती पोस्ट सोशल मिडीयावर करत असतो. या सोशल मिडीयासाठी एखादं गाणं केलं तर हिट होईल असा विचार प्रनिकेत आणि संध्या यांनी केला आणि हे गीत लिहायला घेतले.

आपल्या आवाजाचा वेगळेपण जपणारे या गीताचे मूळ गायक उमेश गवळी हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील करजगावचे रहिवासी. 1972 साली मोठा दुष्काळ पडल्यानंतर त्यांचे वडील विनायक गवळी पुण्यात बिबेवाडी येथे स्थायिक झाले. उमेश हे व्यवसायाने की बोर्ड वादक आणि गायक देखील आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते संगीत क्षेत्रात आहेत. वादन क्षेत्रातली ही त्यांची तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील आणि आजोबा हे देखील वादकच होते. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीत क्षेत्राची आवड निर्माण झाली. परिणामि अभ्यासात मन रमले नाही. म्हणून त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला.

गाणे

उमेश गवळी यांच्या गायनाची शैली, आवाजातील विविधता, माधुर्य, नाविन्य, संगीताचा अप्रतिम खजिना यामुळे त्यांच्या सुमधुर गाण्यांचा प्रभाव रसिकांवर दिसून येतो. ‘तुला काय सोनं लागलाय का?’ ‘घुंगरु पैजणांच, दुसर्‍यांची बायको पटवली’ एकापेक्षा एक मनाला निर्भेळ आनंद देणारी दमदार गाणी उमेश यांनीच गायली आहेत. ही सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. या सर्वच सुमधूर गीतातील बोल हे मनाला भिडणारे आहे. कारण दैनंदिन आयुष्यातील घडामोडींची वास्तविकता या गाण्यांमधून दिसून येते. याशिवाय उमेश हे पुण्यात ‘लॉजिक’ नावाचा म्यूझिक स्टुडिओ देखील चालवतात. गाणं हिट होताच त्यांना राज्यातून कौतुकासाठी फोन येत आहेत.

५० गाणी लिहिल्यानंतर मिळाले सुपर यश

या गीताचे युवा गीतकार आणि संगीतकार संध्या ज्ञानेश्वर केशे ही मूळची नाशिकची तर प्रनिकेत काकासाहेब खुने हा उस्मानाबाद शहरात राहतो. तो म्युझिक कम्पोजर देखील आहे. दोघांनी मिळून या गीताचे बोल रचून संगीतबद्ध केले. या दोघांनी मिळून ५० हून अधिक गाणी लिहिली आहेत. त्यापैकी ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ हे गीत चांगलेच गाजले. उस्मानाबाद शहरात संध्या आणि प्रनिकेत दोघे मिळून प्रस्वर आज्ञा स्टुडिओ हा रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवतात. या गाण्यातून या दोघांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या दोघांवर आणि गायक यांच्यावर सतत कौतुकाचा वर्षाव होत आहे.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here