जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भारतात ही नवीन लस आहे ९० टक्के कोरोनावर प्रभावी, लवकरच मिळणार मान्यता…


कोरोनाचा अजून कहर चालू असल्याने सामान्य जनतेला खूप संकटांना सामोरे जावे लागत आहे, गेल्या दीड वर्षांपासून भारतात कोरोना या आजाराने हाहाकार केला आहे त्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले. आपण या क्षणाची वाट पाहत होतो की या आजारावर कधी लस येत आहे पण सध्या लस उपलब्ध होऊन भारतात सगळीकडे लस देणे चालू आहे. मागील काही दिवसात लस कमी पडल्याने लसीकरण थांबवण्यात आले होते पण अत्ता नंतर लस देणे चालू झाले आहे.

कोरोना

भारतामध्ये सध्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड लस देण्याचे चालू आहे, तसेच भारत बायोटेक ने विकसित केलेली कोवैक्सीन सुद्धा मोठ्या प्रमाणात देणे सुरू आहे. या दोन लसीव्यतिरिक्त पुण्यातील सिरम ने अत्ता नवीन लसीचे उत्पादन चालू केले आहे त्या लसीचे नाव नोवैक्स असे आहे, ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सिरमने काही भागात याची चाचणी सुद्धा सुरू केली आहे.

नोवैक्स लसीचा परिणाम ९० टक्के एवढा आहे, तसेच याचे चांगले परिणाम आपल्या समोर आलेले आहेत. नोवैक्स या लसीचा ट्रायल कमीतकमी ३० हजार लोकांवर केला असून या लसीचा काहीही साईड इफेक्ट नाही. ९०.४ टक्के लस प्रभावित असल्याचे कंपनीने नित्कर्ष ठेवले आहेत.

Advertisement -

कोरोना

कोरोनाचा जेवढे  विषाणू  आहेत त्या सर्व विषाणूवर ही लस १०० टक्के परिणामकारक असून या लसीचे वाहतूक जी होणार आहे ती शुद्ध सरळ आणि सोप्या पद्धतीने केली तरीही काही अडचण नाही. नोवैक्स ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, या लसीचे महिन्याला १०० लाख एवढे डोस तयार होतील असे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांनी अशी सुद्धा माहिती दिली आहे की या वर्षाच्या अखेरीस २० कोटी लस तयार होतील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here