आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जाणून घ्या, जे लोक मांसाहार करतात त्यांची पूजा देवाकडे स्वीकारली जाते का?


आपण आपल्या आजूबाजूस जर निरीक्षण केले तर कमीतकमी ६० ते ७० टक्के लोक मांसाहारी खातात, आणि ते लोक देवाची पूजा सुद्धा करतात पण काही लोकांना हा प्रश्न पडला आहे की जो मांसाहार भोजण करतो त्यांची पूजा देव स्वीकारतात का? तुम्हाला सांगयचे झाले तर जे धर्मग्रंथ आहेत किंवा भगवतगीतेत असे वर्णन आहे की जे लोक मांसाहार भोजन करतात त्यांचा धिक्कार केला आहे. त्या लोकांचा मृत्यू झाला तरी त्यांना मृत्यू लोकांत शांतता लाभत नाही.मांसाहार

असे सांगितले आहे की जेव्हा देवांनी काशीमध्ये प्रवेश केला त्यावेळी प्राणी गवत खात होते. स्कंदपुराणात असे लिहले आहे की एखाद्या मानवाचा अन्नवाचून मृत्यू होत असेल तरी चालेल पण त्यांनी मांस खाऊ नये, तसेच जे लोक दारू पितात किंवा कोणतेही व्यसन करतात त्यांची पूजा स्वीकारली जात नाही.

वराहपुरणात असा उद्देश केला आहे की श्री हरी कृष्णांनी असे सांगितले आहे की जे लोक मांसाहार खातात किंवा जे लोक व्यसन करतात त्यांची मी पूजा स्वीकारत नाही किंवा त्यांना मी माझा भक्त सुद्धा मानत नाही. श्रीकृष्ण सांगतात की मांसाहार एक तामसिक भोजन आहे, आणि ते एक पाप आहे.

भगवान कृष्ण असे म्हणतात की मांसाहार हे भोजन राक्षस लोकांसाठी आहे, मानवाने आजिबात हे खाऊ नये. काही लोकांचे असे मत आहे की वेदांमध्ये मांसाहार ला खूप महत्व आहे पण खर सांगायला गेले तर वेदांमध्ये असे लिहले आहे की पशु हत्या किंवा प्राणी हत्या करणे हे खूप मोठे पाप आहे.

मांसाहार

तसेच अर्थवेदात असे म्हणले आहे की मनुष्याने शाकाहारी जसे की भाज्या, फळे आणि तांदूळ अशा गोष्टी खाव्यात पण तुम्ही प्राणीमात्रांची आजिबात हिंसा नाही केली पाहिजे.

तुम्ही जर मांसाहारी खात असेल किंवा तुमची भूक भागवण्यासाठी जर एखाद्या प्राण्याची हत्या करत असाल तर पुढचा जन्म तुम्हाला तो लाभेल आणि तुमची सुद्धा अशीच हत्या होईल तुम्हालाही मारले जाईल. यावरून आपल्याला असे समजते की आपण शाकाहारी राहिले पाहिजे कोणत्याही प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here