क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांची भेट; अभिनव कडून नीरजला मिळाला ‘टोकियो’


आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे दोन लोक जेव्हा भेटतात, तेव्हा त्याला ‘ग्रेट भेट’ म्हटलं जातं. बुधवारी बिजिंग ऑलिम्पिक विजेता अभिनव बिंद्रा आणि टोकियो ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांची अशीच ग्रेट भेट झाली. या भेटीदरम्यान अभिनवने नीरजला एक सुंदर भेटवस्तू दिली.

चंदीगडमध्ये अभिनव बिंद्राच्या घरी ही भेट झाली. यावेळी अभिनवने नीरजला एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू भेट म्हणून दिले. या पिल्लाचे नाव नीरजने ‘टोकियो’ असे ठेवले असल्याचे त्याने सोशल मीडिया वरून सांगितले.

Neeraj meets Abhinav

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारे अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे दोनच भारतीय खेळाडू आहेत. ट्रॅक अँड फिल्ड खेळातील भालाफेक प्रकारात २३ वर्षीय नीरजने इतर खेळाडूंना मागे टाकत ८७.५८ मी चे विक्रमी अंतर पार करत टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Advertisement -

आपल्या सोशल मीडिया वर नीरजने आपले फोटो पोस्ट करत लिहिले आहे, की “अभिनव बिंद्रा सर आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर एक सुंदर दुपार घालवत मी माझ्या सुट्ट्यांना सुरुवात केली आहे. माझ्या सुवर्णपदकाची त्याच्या बिजिंगच्या मोठ्या भावाबरोबर आज भेट झाली. बिंद्रा कुटुंबियांचे आदरातिथ्यही मी एन्जॉय केले. आदरातिथ्याबद्दल आणि चोप्रा कुटुंबाला ‘टोकियो’ नावाच्या नवीन सदस्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, सर!”


हेही वाचा:

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here