केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल यांसाठी घडामोडींना दिल्‍लीत वेग महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार ?

अनेक दिवसांपासून चर्चेत आणि प्रलंबित असलेल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता मात्र मुहूर्त मिळू शकतो. आणि म्हनुनच  या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्य काय असतील हे आपन बघणार आहोत.

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच विस्तार होणार असून अशा  बदलांची शक्यता मात्र दिसू लागली आहे यातच बदलांविषयी होणाऱ्या घडामोडींना देखील वेग आल्याची चिन्हे आहेत.

कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा जोर आता कमी झाला असल्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी यापेक्षा दुसरी चांगली वेळ असू शकत नाही असंच राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शाह , जेपी नड्डा या तिघांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर या चर्चेने मात्र वेग घेतला आहे

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अनेक जण वेटिंग वर आहेत ज्यात पहिलं नाव काँग्रेस मधून भाजपमध्ये सामील झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांच आहे. मागच्या सव्वा वर्षांपासून ते वाट बघत आहेत परंतु त्यांना अजून हवा तो सन्मान मिळालेला नाही. याशिवाय बिहारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची संधी पुन्हा न मिळालेले सुशीलकुमार आसाम मध्ये मंत्री पदावरून दूर केले गेलेले सर्वानंद सोनोवाल या तिघांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान  मिळेल अशी अपेक्षा आहे

नरेन्द्र मोदी

Advertisement -

 

* पुढील काही कारणामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तातडीने गरज आहे

– केंद्रात सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण चार मंत्री पद रिक्त आहेत. पहिले म्हणजे शिवसेना ,अकाली हे दोन मित्र पक्ष बाहेर पडल्याने आणि रामविलास पासवान यांचे  निधन झाल्याने तीन कॅबिनेट मंत्रिपद तर सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे एक राज्यमंत्री पद रिक्त आहे.

  • कदाचित करोना काळात झालेल्या टीकेनंतर सरकारला जी प्रतिमा बदल करण्याची गरज वाटते ती यानिमित्ताने पूर्ण होऊ शकते.
  • उत्तर प्रदेशसह इतर पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षी घेण्यात येणार आहेत, तर त्या दृष्टीने मंत्रिमंडळात जर काही बदल करायचे असतील तर हीच योग्य वेळ आहे.
  • आता महाराष्ट्र राज्याच्या डोळे मात्र याकडे लागलेले आहेत ती या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार मध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागते!

शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खात्याचा अतिरिक्त भार हा प्रकाश जावडेकर यांना देण्यात आला असून महाराष्ट्रातून मोदी कोणाला मंत्रिमंडळात घेणार आहे त्याची ही त्यामुळेच उत्सुकता असेल.

शिवसेना अकाली दल हे दोन जुने मित्र पक्ष बाहेर पडल्यानंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये एकही मित्रपक्ष उरलेला नाही. आरपीआयचे रामदास आठवले हे एकमेव मंत्री आहेत जे  मंत्री पक्षाचे आहेत परंतु ते राज्यमंत्री असल्यामुळे कॅबिनेटमध्ये नाहीत.

या कारणांमुळे सध्या मोदींचा कॅबिनेट हे पूर्णपणे भाजप कॅबिनेट आहे आणि याच अनुषंगाने इतर मित्रपक्षांना यात सामावून घेणे हाही महत्त्वाचा मुद्दा असेल. बिहारमध्ये जेडीयू सोबत सत्ता आली तर अजून जेडीयूचा एकही मंत्री केंद्रात नाही. त्यांना किती मंत्रिपद मिळतात हे पाहणे देखिल तितकेच महत्वाचे असेल. शिवाय हे सगळं करताना ज्या यूपीतून दिल्लीचा मार्ग जातो त्या यूपीची निवडणूकही मोदींच्या डोळ्यासमोर असेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here