‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, नारायण राणेची मुख्यमंत्र्यावर जहरी टीका…


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. नारायण राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत आगमन होताच नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्धाला सुरूवात झाली होती. त्यानंतर आता महाड इथे पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावेळी त्यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्यदिनी भाषण देताना काहीसे गडबडले होते. त्यावरून नारायण राणे यांनी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.

नारायण राणे

देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही, अशी टीका देखील त्यांनी केलीय. तर राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

दरम्यान, एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे त्यामुळे मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं देखील नारायण राणे यांनी सांगितलं आहे.


=

Advertisement -

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here