जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ताडीच्या झाडाची लागवड करून,नांदेडचा हा शेतकरी वर्षाला 8 ते 10 लाखांच उत्पन काढतोय..


आजच्या आधुनिक जगासोबत तडजोड करण्यासाठी शेतकरी राजाला आधुनिक बनवण्याची गरज आहे, आणि यातच काही शेतकरी चांगले उदाहरण बनत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने आणि पारंपारिक पिके न घेता काही शेतकऱ्यांनी अलग निर्णय घेऊन सर्वांच्या समोर आदर्श निर्माण केला आहे.

असाच आदर्श निर्माण केला आहे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने, हा शेतकरी ताडाच्या झाडांची लागवड करून वर्षाकाठी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर….

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात येणाऱ्या नरशी या गावातील शेतकरी प्रकाश भिलवंडे पाटील यांनी आपल्या पाडीत असलेल्या दीड एकर जमिनीमध्ये ताडीच्या झाडांची लागवड केली आहे. दीड एकरमध्ये लावलेल्या १२०० ताडीच्या झाडांतून प्रकाश भिलवंडे यांना १० लाख रुपयांचा मुनाफा मिळत आहे. शेतातील इतर पिकांप्रमाने ताडीच्या झाडांसाठी खूप कमी मशागत करावी लागते. संपूर्ण स्शेतात हे झाडे न लावता जर आपण आपल्या शेताच्या बांधांवर यांची लागवड केली आणीई थोडेफार पानिई असेल तर यामधून तुम्हाला चांगली उत्पन्न मिळू शकते.

मराठवाड्यातील नांदेड हा जिल्हा एकेकाळी नीरा विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाच्या बाबतीत अव्वल होता. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, देगलूर, बिलोली या तालुक्यांना कोट्यावधी महसूल देणारे तालुके म्हणून ओळखल्या जात असे. मानवणे आपल्या विकृत प्रकृतीमुळे येणाऱ्या काळात खूप झ्दांची कत्तल केली आणि याठिकाणी ही झाडे खूप कमी प्रमाणात आहेत. त्याकाळचा विचार करून आणि काही अर्र्थिक फायदे ध्यानात घेऊन प्रकाश भिलवंडे यांनी ताडीच्या झाडांची लागवड केल्याचे सांगितले आहे.

Advertisement -

ताडी

हळूहळू नामशेष होत असलेल्या ताडीच्या झाडांची शासनाने सुद्धा लागवड करावी, सरकारी नर्सरीमध्ये या झाडांना वाढवून जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली तर यातून शेतकरी आणि प्रशासन दोघांनाही चांगला फायदा होऊ शकतो.

ताडीच्या झाडांपासून मिळणारी नीरा हि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी असते. सकाळी उठून जर नीरा प्याल्याने पोटांचे अआनेक्क विकार बरे होतात. मुतखड्याची समस्या जाणवत असेल तर त्यासाठी नीरा ही रामबाण इलाज आहे. आपण अज्जारी असल्यास डॉक्टर आपल्याला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात परंतू नारळ पाण्यापेक्षा किती तरी पट जास्त पोषक घटक हे ताडीच्या नीरामध्ये असतात.

नदीच्या काठच्या खडकाळ जामिनींवर ताडीच्या झाडांची चांगली वाढ होते. त्यामुळे या झाडांची लागवड शेतकऱ्यांनी कराविई आणि आपले उज्वल भविष्य स्वताच घडवावे असा सल्ला प्रकाश भिलवंडे यांनी दिला आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here