क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

CSK vs RCB: महेंद्रसिंग धोनीने आपल्या गोलंदाजांना दिले विजयाचे श्रेय


कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने शारजाह येथे खेळवल्या गेलेल्या आयपीएल २०२१ च्या ३५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा सहा गडी राखून पराभव केला. या सिझनच्या दुसऱ्या टप्प्यातील आरसीबी चा हा दुसरा पराभव आहे. या विजयामुळे सीएसके चा संघ १४ गुणांसह पॉईंट टेबल मध्ये पहिल्या क्रमांकावर पोचला आहे.

नाणेफेक गमावून आरसीबी ने प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. सीएसके ने ११ चेंडूंत ४ गडी गमावत लक्ष्य गाठले. दरम्यान महेंद्रसिंग धोनीने आरसीबी ने चांगली सुरुवात केली होती असे सांगितले. तसेच या विजयाचे श्रेय त्याने आपल्या संघाच्या गोलंदाजांना दिले आहे.

MS Dhoni CSK

ब्राव्होला संधी
दव पडल्यामुळे धोनी काही काळ चिंतित होता. ड्रिंक ब्रेक दरम्यान त्याने मोईनला गोलंदाजी करण्यास सांगितले. पण ऐनवेळी आपला निर्णय बदलून त्याने गोलंदाजी ब्राव्होला दिली. ब्राव्हो खेळासाठी अत्यंत फिट असून आपण त्याचा चांगला वापर करून घेत असल्याचेही यावेळी धोनीने सांगितले.

Advertisement -

ब्राव्हो बद्दल बोलताना धोनीने सांगितले, की तो ब्राव्होला भावासारखा मानतो आणि त्यांच्यात ब्राव्होच्या स्लो बॉलिंग वरून वाद देखील होतात. पण आता प्रत्येकालाच त्याच्या गोलंदाजीचा अंदाज आला असून मी त्याला एका षटकात सहा वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करण्यास सांगितले आहे.

धोनीचे आगामी धोरण
आपल्या आगामी धोरणाबद्दल बोलताना धोनीने सांगितले, की आमचे फलंदाज कोणत्याही पोझिशनवर चांगले खेळू शकतात. मात्र आम्ही डावखुऱ्या फलंदाजांना मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे रैना आणि रायडूला नंतर खेळवण्यात येणार आहे.


हेही वाचा:

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here