धोनी

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

धोनी आयपीएलमधून घेणार नाही संन्यास; जाणून घ्या कधीपर्यंत तो चेन्नई सुपरकिंग्ज कडून खेळणार!


टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 40 वर्षांचा झाला आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा धोनी आता फक्त आयपीएल खेळतो. आता असा अंदाज वर्तविला जात आहे की, धोनी लवकरच आयपीएलला निरोप देणार आहे, पण या दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, धोनी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) कडून किती काळ खेळत राहील. आयपीएल 2021 नंतर धोनीचा चेन्नई सुपर किंग्जबरोबरचा करार संपुष्टात येईल, पण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मत वेगळे आहे.

IPL 2020: महेंद्र सिंह धोनी: कहां गया वो मैजिक, उसे ढूंढो - BBC News हिंदी

चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, धोनी आता तंदुरुस्त आहे आणि त्याच्यामधे बरेच क्रिकेट बाकी आहे. ते म्हणाले, ‘धोनी चेन्नई सुपर किंग्जबरोबर आणखी एक किंवा दोन वर्ष राहू शकेल.  धोनीने क्रिकेट सोडण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.  जिथपर्यंत आमचा प्रश्न आहे, आम्ही त्यांच्याबरोबर खूप आनंदी आहोत.  हे फक्त कर्णधारपदाबद्दलच नाही तर तो अजूनही संघासाठी एक उत्तम खेळाडू आहे.  तो फिनिशर असून तो ही भूमिका करत आहे. चेन्नईच्या सीईओच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की त्याची टीम आगामी हंगामासाठी धोनीला राखून ठेवणार आहे.

धोनी चौथ्यांदा चेन्नईला चॅम्पियन बनवू शकतो

धोनी

एमएस धोनी पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 8 अंतिम सामने खेळले त्यापैकी संघाने तीन वेळा विजय मिळविला. आयपीएल 2021 थांबेपर्यंत चेन्नई सुपर किंग्जची स्थिती मजबूत होती. पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या या संघाला या मोसमात जिंकण्याची संधी आहे.

आयपीएलमध्ये धोनीचा अप्रतिम विक्रम

एमएस धोनीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. धोनीने 211 सामन्यात 40.25 च्या सरासरीने 4669 धावा केल्या आहेत. त्याने एकूण 217 षटकार लगावले आहेत. मात्र, गेल्या दोन मोसमांमधून त्याची बॅट शांत दिसत आहे. पण एक कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून त्याचा जलवा आजही कायम आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here