आपल्या आजूबाजूस खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आपण रोज पाहतो मग ती जंगलात असो किंवा इत कोणत्या ठिकाणी असो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका झाडाबद्धल सांगणार आहोत जे काही म्हणजे अगदी कमी लोकांनी ऐकले असेल की पैसे देणारे झाड, झाला ना तुम्ही हैराण पण हे सत्य आहे ही खरी गोष्ट आहे.

पैश्याचे झाड

जेव्हा आपण पैसे खर्च करू किंवा पैसे मागू त्यावेळी आपल्या घरातील आईवडील असो किंवा आजी आजोबा असो असे म्हणतात की पैसे काय झाडाला लागले आहेत. पण ब्रिटन मध्ये एक झाड आहे या झाडाची ही गोष्ट चुकीची ठरवून दिली आहे. या झाडाला पैसे लागले आहे हे झाड पीक डिस्ट्रिक्ट मध्ये आहे.

जवळपास १७०० वर्ष झाली या झाडाला हजारोंच्या संख्येने  पैसे लागले आहेत. पण ही गोष्ट असे आहे की इथे फक्त ब्रिटन चे जे चलन आहे ते पैसे लागले नसून जगात जेवढे देश आहे त्यांची चलन त्यांचे पैसे आपल्याला पाहायला भेटतील.

Advertisement -

See, The Coin Wishing tree Of Great Britain-m.khaskhabar.com

वेल्स मधील पोर्टमेरियन गावात हे झाड एक पर्यावरण टुरिस्ट स्पॉट बनलेला आहे, ज्या झाडावर लोक पैसे लावतात. या झाडावर अशी कोणतीच जागा शिल्लक नाही जिथे पैसे लागले नाहीत. या झाडाला खूप लोक मानतात तसेच अनेक लोक या झाडाला शुभ मानतात त्यामुळे इथे लोक या झाडाला पैसे लावतात.

पैशाचे झाड

काही लोकांचे असे म्हणणे आहे की या झाडाला जर तुम्ही पैसे लावाल तर तुमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल.

तसेच तेथील काही लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की या झाडामध्ये एक पावर आहे त्याला डिवाइन पावर असावं म्हणतात. ज्यावेळी ख्रिसमस चा सण असतो त्यावेळी तिथे मिठाई ठेवली जाते तसेच जे प्रेमी लोक आहेत ते तिथे त्यांचे प्रेम अजून घट्ट व्हावे म्हणून पैसे लावतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here