जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

१६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’
७० वर्षीय मीनाताईंची किमया
परसबागेत फुलवला फळझाडांचा हिरवागार मळा


 

 

सोलापूर : घरातल्या कच-याची घरातच शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यातून घरच्या घरी कंपोस्ट खत तयार केले आहे. या खताचा वापर फुल अाणि फळझाडांसाठी करत आपल्या परसबागेत उपयुक्त फळझाडांचा मळा फुलविला आहे. ही किमया साधली आहे होटगी रोड परिसरातील मीना मोकाटे यांनी.

कंपोस्ट खत

मूळच्या पुण्यातल्या असलेल्या मीना मोकाटे या लग्नानंतर सोलापुरात स्थायिक झाल्या. गेल्या चाळीस वर्षांपासून त्या सोलापुरात स्थायिक आहेत. सोलापुरात पूर्वीपासूनच पाण्याचं दुर्भिक्ष्य अन् मोठा कडक उन्हाळा असतो, हे त्यांनी जाणले आणि पर्यावरणासाठी काहीतरी करावे असा विचार त्यांच्या मनात आला. सुरुवातीला त्यांनी जशी जमतील तशी २००४ साली आपल्या घराच्या परिसरात झाडे लावली. मात्र पाण्याअभावी काही वाढली नाहीत.

लावलेली झाडे चांगली टिकावी आणि ती सदाहरित रहावी यासाठी त्यांना कंपोस्ट खत तयार करण्याचा संकल्प केला. पर्यावरणाचा विचार करून घरातील ओला आणि सुका कचरा फेकून अथवा घंटागाडीत जमा करण्याऐवजी तो आपल्या घरीच  खतासाठी वापर करण्यास सुरुवात केली. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी त्यांनी जमिनीत खड्डा करून तयार करण्याऐवजी एक मोठा प्लास्टिकचा ड्रम घेऊन त्यात खत निर्मिती करू लागले.

 

दोनशे किलो खत साठवेल इतका मोठा असलेल्या या ड्रमला  हवा खेळती राहण्यासाठी चारी बाजूने मोठे छिद्र पाडण्यात आले. घरातील फळे भाज्या यांच्या साली, बिया, खराब निघालेली भाजी तसेच निर्माल्य म्हणजेच सुकलेली फुले पाने हे सर्व त्या ड्रममध्ये दहा महिने जमा केले जाते.

 

ड्रममधील गरम हवा बाहेर जाण्यासाठी त्यामध्ये एक मोठा गॅस पाईप ठेवला. एक महिना तो ड्रम झाकून ठेवले जाते. अकरा महिन्यानंतर कंपोस्ट खत तयार होते. ते तयार झालेले खत चाळून बागेतील  झाडांना वापरले जाते. खत तयार करण्याची ही प्रक्रिया निरंतर सुरू असते.

वर्षभर तयार होते कंपोस्ट खत 

पाण्याचे योग्य नियोजन आणि घरी तयार केलेले खत झाडांना पुरवल्यामुळे घराजवळची भाग हिरवळीने नटली आहे. विशेष म्हणजे मिनाताईंनी फुलवलेल्या या बागेत  हर एक प्रकारचे फळझाड आहे. काजू, केळी, आंबा, नारळ, पपई, डाळींब, आवळा, लिंबू, लिंत्र, लिची, चिक्कू, पेरु, सिताफळ अशी फळ झाडे आहेत. कारली, घोसाळी, कोहळा, मिरची, अशा भाज्या पण आहेत.

कंपोस्ट खत

पर्यावरण संवर्धनाला हातभार लावल्याचा आनंद 

पर्यावरणासाठी काहीतरी करावे असा विचार मनात सतत होता. त्या अनुषंगाने मी माझ्या परसबागेत अनेक झाडे लावली. या झाडांसाठी लागणारी कंपोस्ट खत घरच्या घरीच तयार करते. ओला आणि सुका कचरा घंटागाडीत देण्याऐवजी तोच घरी साठवून त्याचे खत तयार करता येते. असे केल्यास पर्यावरण  संवर्धनाला हातभार लागतो. खत तयार करण्याची ही प्रक्रिया गेल्या सोळा वर्षांपासून सुरु आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here