क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

आयपीएल वरून भारताला ट्रोल करण्याचा प्रयत्न; भारतीयांनी दिले मायकेल वॉनला प्रत्युत्तर


इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन त्याच्या ट्विट्स मुळे कायमच चर्चेत राहिला आहे. यावेळीही आपल्या एका ट्विटद्वारे त्याने आयपीएल वर निशाणा साधत भारताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचा हा डाव भारतीय नेटकऱ्यांनी त्याच्यावरच उलटून लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आयपीएलच्या युएई लेग मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी हैद्राबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आयपीएलच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे माहिती देण्यात आली. ही माहिती समोर येताच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने बीसीसीआयला आपल्या ट्विट मधून ट्रोल करायचा प्रयत्न केला, मात्र त्यालाच आता नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Michael Vaughan

टी नटराजनच्या मुद्द्यावर मायकेल वॉनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर लिहिले आहे, की “गेल्यावेळच्या कसोटी सामन्याप्रमाणे आता आयपीएल देखील रद्द होते का ते पाहू! असं काहीही होणार नाही हे मी खात्रीने सांगतो…”

Advertisement -

काही काळापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द करावा लागला होता. इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी यावर नाराजी दर्शवली होती.

मायकेलच्या या ट्विटला रिप्लाय करत अनेक नेटकऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यातले काही रिप्लाय खूपच मजेदार आहेत. ‘त्यामध्ये आधीच सांगितलं आहे की ठरल्याप्रमाणे मॅच होणार आहे, जरा नीट वाचण्याचे कष्ट घ्या’, ‘प्रिय बीसीसीआय आणि आयपीएल, कृपया या इसमाला आयपीएल मध्ये घ्या’, ‘पुन्हा रडतोय, हो ना? जरा या सगळ्यातून विश्रांती घे मायकेल’ अशा शब्दांत भारतीयांनी मायकेल वॉनची खिल्ली उडवली आहे.

 


हेही वाचा:

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here