क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..


आयपीएल 14 चा दुसरा टप्पा विक्रमी 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि 3 वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने सुरू झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात खराब झाली. चेन्नई ने 7 धावांत 3 विकेट गमावल्या.

एकीकडे चेन्नईचे फलंदाज एक एक करून बाद होत असतांना मराठमोळा ऋतुराज गायकवाड मात्र एक बाजू  धरून लढत होता..

धोनी

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही या सामन्यात प्रेक्षकांना निराश केले.  धोनीला बोल्टने मिलनच्या हाती झेलबाद केले. पॉवरप्लेमध्ये चेन्नईने एकूण 24 धावांवर आपले चार गडी गमावले. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धोनी बाद झाला. त्याने 5 चेंडूंत 3 धावा केल्या.

Advertisement -

धोनीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा लावून बसलेल्या प्रेक्षकांच्या पदरी यावेळी पुन्हा निराशाच पडली. गेल्या अनेक सामन्यात धोनी लोकीकाला साजेशी खेळी करण्यास अपयशी ठरतोय..

चेन्नई ने  20 षटकांत ऋतुराजच्या 88धावांच्या योगदानासह 156धावा केल्या, मुंबईला आता जिंकण्यासाठी 157धावा कराव्या लागणार आहेत..


हेही वाचा:

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here