जगभरातील महत्वाच्या बातम्या आणि लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

शूटिंगच्या सेटवरच जिवंत जळाली ही अभिनेत्री, माचीसच्या एका काडीमुळे गमवावा लागला होता जीव…!


प्रत्येक दृश्य शक्य तितके वास्तविक बनवण्याचा प्रयत्न फिल्मी दुनियेत केला जातो जेणेकरुन प्रेक्षकांना चित्रपट पाहताना तीच भावना अनुभवता येईल. मात्र काही वेळा असे प्रयत्न धोकादायकही ठरतात. कधी कलाकारांच्या चुकीमुळे तर कधी निर्मात्यांच्या चुकीमुळे शूटिंग सेटवर मोठी दुर्घटना घडते.

अशीच घटना घडली होती ती म्हणजे हॉलीवूड अभिनेत्रीमार्था मॅन्सफिल्डसोबत..

आज आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत, ज्यामध्ये अभिनेत्रीला तिसऱ्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. आम्ही बोलत आहोत दिवंगत हॉलिवूड अभिनेत्री मार्था मॅन्सफिल्डबद्दल. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मार्था मॅन्सफिल्डचा एक भयानक अपघात झाला, ज्यानंतर अनेक प्रयत्न करूनही तिचा जीव वाचू शकला नाही.

अभिनेत्री

Advertisement -

मार्था मॅन्सफिल्ड ही त्या काळातील सुपरस्टार होती जेव्हा चित्रपटांमध्ये आवाज नव्हता. ‘द वॉरन्स ऑफ व्हर्जिनिया’ साठी शूटिंग करत असताना मार्था मॅन्सफिल्डने तिचा गृहयुद्धाचा पोशाख परिधान केला होता ज्याने पटकन आग पकडली. सीन संपवून ती गाडीत बसली आणि आराम करायला लागली. त्याचवेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिच्या दिशेने माचिसची काडी फेकली.

या काडीमुळे मार्थाच्या ड्रेसला आग लागली आणि ती जळून खाक झाली. अपघातानंतर मार्था मॅन्सफिल्डला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू राहिले. पण मार्था मॅन्सफिल्ड इतकी भाजली की तिला वाचवता आले नाही. दोन दिवसांनी मार्थाने आपला जीव गमावला होता.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here