जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

91 वर्षीय महिलेने केले 23 वर्षाच्या मुलाशी लग्न, हनीमुनला झालं असं काही कि कोणी विचारही केला नसेल…


प्रेम ना धर्म पाहतो ना वय, प्रेम बघते फक्त प्रेम. प्रेमासाठी अनेकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मात्र काही प्रेमकथा कायम ‘अमर’ ठरतात. त्याचबरोबर काही प्रेमकथांवर टीकाही होते. पण,आज आम्ही तुम्हाला जी प्रेमकहाणी सांगणार आहोत, त्यात प्रेम तर आहेच, पण भावनांसोबतच वेदना आणि दु:खही आहे. कारण, ही प्रेमकहाणी 91 वर्षीय महिला आणि 23 वर्षीय मुलाची आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रेमकथेबद्दल…

एक 91 वर्षांची अर्जेंटिनियन महिला तिच्या मित्राच्या मुलाच्या प्रेमात पडते, जो 23 वर्षांचा आहे, दोघांनीही लग्न केले पण हनिमूनवर एक अशी घटना घडली ज्याने सर्व काही बदलून टाकले आणि कथेला एक नवीन वळण मिळाले.

लग्न

मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला मित्राच्या घरी राहत होती. तिचा 23 वर्षांचा मुलगाही महिलेच्या मैत्रिणीच्या घरी राहत होता. त्याच्या मित्राची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. महिलेला मिळणाऱ्या पेन्शनमधून ती मदत करायची. पण, पुन्हा पुन्हा महिलेच्या मनात प्रश्न निर्माण होत होता की तिचा मृत्यू झाला तर मदत कोण करणार? अशा परिस्थितीत महिलेने मोठा निर्णय घेतला आहे. तिने आपल्या मित्राच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement -

महिलेने मित्राच्या मुलाला लग्नासाठी प्रपोज केले. मुलानेही लग्नाला होकार दिला. बाईला वाटले की आता ती मेली तरी मुलाला पेन्शन मिळत राहील. लग्नानंतर दोघेही हनिमूनला गेले. पण,हनिमून दरम्यान महिलेचा अचानक मृत्यू झाला.

जेव्हा मुलाने पेन्शनसाठी दावा केला तेव्हा खरी समस्या सुरू झाली. उलट अधिकाऱ्यांनी मुलावर फसवणूक केल्याचा आरोप केला. पेन्शनसाठी तिच्याशी लग्न केल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांनी मुलाला तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू केली. मुलगा तुरुंगात जाण्यापासून कसा तरी वाचला असला तरी त्याच्या अडचणी वाढल्या.


==

आमचे नवनवीन लेख

वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here