जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

मोहोळच्या अष्टपैलू मनोजची बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात ‘एण्ट्री’!


सोलापूर – बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली असून त्यात मोहोळ येथे राहणार्‍या मनोज धोत्रे या अष्टपैलू खेळाडूची निवड भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात झाली आहे. भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाल्याने मनोजच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ शहरातील अादर्शनगर येथे  राहणारा ३८ वर्षीय मनोज धोत्रे हा पायाने दिव्यांग अाहे. लहानपणी त्याला पोलिओच्या आजाराने ग्रासले होते. यात त्याचा डावा पाय निकामी झाला.  त्याने आपले क्रिकेटमधील कौशल्य सिद्ध करून दाखवत आपल्या व्यंगत्वावर मात केले. मनोजने डीएडपर्यंतचे शिक्षण मोहोळ येथून पूर्ण केले. क्रिकेटच्या आवडीपायी त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. त्याने आपल्या क्रिकेटची सुरवात बॉलबॉय म्हणून सुरुवात केली होती. अाज तो एक बॅटींग ऑलराऊंडर म्हणून नावारुपास आला आहे.

मनोजने त्याचा मोठा भाऊ नगरसेवक रूपेश धोत्रे यांच्यापासून प्रेरणा घेत क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना त्याला दिव्यांग क्रिकेट संघाविषयी माहिती मिळाली आणि त्याने क्रिकेट खेळण्यावर अधिक जोर दिला. विविध संघाकडून तो जिल्हा पातळीवर क्रिकेट खेळू लागला. जिल्हास्तरावर त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत छाप सोडली. त्याच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर त्याला महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघात स्थान मिळाले. पुढे त्याच्याकडे मुंबई दिव्यांग क्रिकेट संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. तो तीन वर्षे या संघाचा कर्णधार होता.

गतवर्षी हैदराबाद येथे झालेल्या दिव्यांग क्रिकेट संघाच्या शिबिरात त्याने आपल्या कामगिरीने निवड समितीला प्रभावित केले. आणि त्याला भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात संधी मिळाली. सोमवारी त्याला निवड समितीचे पत्र मिळाले असून लवकरच तो भारतीय संघात सामील होईल. १२ अॉगस्टपासून सुरु होणार्‍या बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार वसंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मनोज आता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. त्याला प्रशिक्षक संजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय संघात त्याची निवड होणे ही सोलापूर वासीयांसाठी खरोखरच अभिमानास्पद बाब असून सर्वत्र त्याच्या निवडीबद्दल कौतुक होत आहे.

Advertisement -

क्रिकेट

दिव्यांगांना करतोय मदत

मनोज हा आमदार बच्चू कडू यांचा जबरदस्त फॅन आहे. त्यांच्या कामगिरीने प्रभावित होऊन त्याने राजकारणातदेखील एन्ट्री केली आहे. तो प्रहार अपंग क्रांती संघटनेचा मोहोळ तालुका अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहे. क्रिकेट शिवाय मनोज त्याच्या इतर दिव्यांग मित्रांना प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करतो, शिवाय दिव्यांगांना पेन्शन मिळवून देण्यासाठी अर्ज भरून देणे यासारखी कामे करत असतो. मनोजचे कुटुंब मोठे असून त्याला ५ भाऊ आणि ४ बहिणी आहेत. आई आणि त्याचा एक भाऊ डॉक्टर आहेत. हे सर्व जण त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ देतात. तो विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.

===

 

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी  www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here