जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

अभिनेता मनोज वाजपेयीवर दुःखाचा डोंगर, वडील राधाकांत वाजपेयी यांच निधन….


 

मनोज वाजपेयी यांचे वडील राधाकांत वाजपेयी यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 85 वर्षीय राधाकांत वाजपेयी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Manoj Bajpayee, Manoj Bajpayee Father, Manoj Bajpayee Father died, Radhakant Bajpayee

वडील आजारी असल्याची बातमी कळताच मनोज वाजपेयी यांनी केरळमध्ये सुरु असलेलं फिल्मचं शूटिंग सोडून दिल्ली गाठली होती. अभिनेते मनोज यांचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. मनोज वाजपेयीच्या वडिलांच्या निधनाची बातमी ‘SHE’ चे संचालक अविनाश दास यांनी या वृत्ताला दुजोरा देत ट्विट केलं आहे.

Advertisement -

अविनाश दास यांनी एका फोटोसह एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, मनोज भैय्याचे वडील आता नाहीत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आता आठवत आहेत. मी हा फोटो भितिहरवा आश्रमात काढला होता. ते महान सहनशक्तीचा असलेलं व्यक्तीमत्त्व होतं. नेहमी स्वतःला मुलाच्या ऐश्वर्याच्या स्पर्शापासून दूर ठेवले. माफक विणकाम करणारे ते मोठे व्यक्ती होते. अभिवादन श्रद्धांजली.

मनोज वाजपेयी

राधाकांत वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर बॉलिवूड आणि अभिनेत्याचे मूळ गाव असलेल्या गौनाहा खंडाच्या बेलव्यात शोककळा पसरली आहे. गावातील लोकं सांगतात की, ते अत्यंत दयाळू होते. तसंच ते नेहमी गरीबांना मदत करायचे. गेले कित्येक महिने त्यांची प्रकृती खूपच खराब होती. अलीकडेच त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राधाकांत यांना तीन मुलं आहेत, ज्यात सर्वात मोठा मुलगा अभिनेते मनोज वाजपेयी आहे. मनोज यांच्या वडिलांनी त्यांना पश्चिम चंपारणमधील एका छोट्याशा खेडे गावातून मुंबईला पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here