आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

संपूर्ण आयुष्य झाडावरच घालवणारा आजच्या काळातील मोगली, वयाच्या 60 वर्ष आजूनही राहतोय जंगलात…!


उत्तर प्रदेश मध्ये एक व्यक्ती असा आहे जी झाडावर राहते त्यांना बंदरिया बाबा असे म्हणतात, बंदरिया बाबा ला पाहण्यासाठी तिथे खूप लोक येत आहेत. या बाबांचे वय कमीत कमी ६० आहे तरीही त्यांना नरवानर जशी शक्ती आहे.

बहराइच मधील सुजौली येथे हा व्यक्ती झाडावरच खातो आणि झोपतो. हे बाबा एक भगवा कपडा घालून साधूच्या वेशभूषा धारण करतात याना बंदरिया बाबा अशा नावाने ओळखले जाते. बंदरिया बाबांचे असे मत आहे की ते भगवान हनुमानाचे परमभक्त आहेत आणि त्यांना एक वेगळीच शक्ती त्यांनी प्रदान केली आहे. बंदरिया बाबा असे म्हणतात की माझ्यावर भगवान हनुमान चा आशीर्वाद आहे.

झाडझाड

भगवान हनुमान यांनी मला झाडावर चढण्याची शक्ती प्रदान केली आहे, मी झाडावर राहतो आणि तिथेच पूजा पाठ करतो आणि मी तिथेच झोपतो. मी झाडाच्या कोणत्याही एका फांदीवर बसून देवाचे ध्यान करतो. बंदरिया बाबा पिलीभीत जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत असे सांगितले जाते, तसेच त्यांनी काही वर्षे हरिद्वार मध्ये घालवले आहेत पण त्यांच खरे नाव कोणाला माहीत नाही.

Advertisement -

चार महिने झाले ते बाबा बहाराई मध्ये आले आहेत, जे की पोलिसांनी त्यांना तिथून पळवून लावले होते कारण न्याय व्यवस्थेसाठी त्यांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पण बाबा नंतत माघारी आले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी होत आहे.

बाप रे
बाप रे

बहराइच पुलिस मधील जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कुमार सिंह यांनी असे सांगितले आहे की कानून व्यवस्था राखण्यासाठी आम्ही खूप भागात पोलीस ठेवले आहेत. जितेंद्र सिंह यांनी असेही सांगितले की बाबांना पाहण्यासाठी तिथे खूप गर्दी होत आहे त्यामुळे अचानक काही होऊ शकते म्हणून आम्ही पोलीस तैनात करत आहोत.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here