आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

छोट्याश्या बाचाबचीवरून रुममेटने घेतला जीव, मृतदेहाची विल्हेवाट लावून रूमवर येऊन झोपला.


महाराष्ट्रातील नागपुरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका 26 वर्षीय व्यक्तीने आपल्या 35 वर्षीय रूममेटची लहान भांडणानंतर हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. त्या व्यक्तीने रूममेटची हत्या केली, त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि परत येऊन शांतपणे झोपला

नागपूरच्या दाभा परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. यापूर्वी काही मुद्द्यावरून राजू नंदेश्वर आणि आरोपी देवांश वाघोडे यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणामध्ये देवांशने राजूची हत्या केली.

जीव

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघे भाड्याच्या खोलीत राहत होते आणि गॅरेजमध्ये कार मेकॅनिक म्हणून काम करत होते.

Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, देवांशने राजूच्या डोक्यात धारदार वस्तूने वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मग त्याने मृतदेह फेकला, खोली स्वच्छ केली आणि झोपायला गेला,

मात्र, स्थानिकांनी लवकरच मृतदेह भाड्याच्या खोलीजवळ रिकाम्या जागेत पडलेला पाहिला आणि पोलिसांना कळवले. वाघोडेवर आता भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here