क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

भारताला मिळाला ख्रिस गेल! लाँन्ड्री स्टिक वापरून आजीने बनवले त्याला क्रिकेटर


आयपीएल मुळे भारतीय क्रिकेट संघाला नेहमीच तरुण आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू मिळाले आहेत. अनेक क्रिकेटपटू त्यांच्या आयपीएल मधील कामगिरीमुळे प्रकाशझोतात आले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघातील आयपीएल सामन्यानंतर लक्षात राहिले ते दोन खेळाडू. यातील एका खेळाडूला तर ‘तरुण गेल’ असे टोपणनाव देण्यात आले आहे.

त्यापैकी एक खेळाडू आहे ‘राजस्थान रॉयल्स’ मधील २१ वर्षीय महिपाल लोमरोर. १७ चेंडूंत विक्रमी ४३ धावा त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये त्याने चार षटकारांसह दोन चौकार मारले आहेत. राजस्थानच्या नागौर गावच्या या युवा खेळाडूने लहानपणापासूनच क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते.

Mahipal Lomror

महिपालची आजी सिंगारी देवी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांचा नातू लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याचा हट्ट करायचा. बॅटऐवजी तो कपडे धुवायच्या लाकडी बॅटने म्हणजेच लाँन्ड्री स्टिकने क्रिकेट खेळू लागला. नातवाच्या आग्रहापुढे हताश होत आजीने त्याला बॅट मिळवून दिली. मग रस्त्याला मैदान बनवत आणि मोठ्या बहिणीला बॉलर बनवत त्याचा फलंदाजीचा सराव सुरू केला.

Advertisement -

त्याची प्रतिभा पाहून त्याच्या वडिलांनी नागौरला प्रशिक्षक आणि सुविधेच्या अभाव असल्याने त्याला वयाच्या ११ व्या वर्षी जयपूरला पाठवले. इथेही त्याच्या आजीने त्याची साथ दिली. ती त्याच्याबरोबर राहू लागली.

महिपालला त्याच्या लॉंग हिटमुळे ‘छोटा ख्रिस गेल’ म्हणून ओळखलं जातं. फलंदाजीव्यतिरिक्त तो डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. ‘राजस्थान रॉयल्स’ मध्ये सामील झाल्यापासून त्याने ८ आयपीएल सामन्यांमध्ये मिळून १३० धावा केल्या आहेत.


हेही वाचा:

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here