जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ना रंग, ना ब्रश… जादुई बोटांनी झटपट साकारतोय पोट्रेट


सोलापूर : प्रत्येक चित्रकार ब्रश आणि कलरच्या माध्यमातून बहारदार चित्र रेखाटताना आपण पाहिले असेलच. दुसरीकडे असा एक कलाकार आहे जो ब्रश किंवा कलरचा वापर न करता आपल्या जादूई बोटाच्या माध्यमातून अफलातून पोट्रेट चित्रे साकारतोय. हाताच्या बोटांनी पोट्रेट चित्रे काढण्याची त्याची ही शैली सोशल मिडीयावर सुपरहिट ठरत असून अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या चित्रांचे व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत कौतुक केले आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत बोटांनी पोट्रेट चित्रे साकारणार्‍या या युवा चित्रकाराचे नाव महेश कापसे अाहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी येथे राहणार्‍या महेशला लहानपणापासून चित्रांच्या दुनियेत रमायला आवडायचं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या २३ वर्षीय महेशने चित्रकलेच्या आवडीपोटी बारावीनंतर ‘आर्ट डिप्लोमा टीचर’चा कोर्स पूर्ण केला. परिस्थिती नसतानाही त्याच्या आईवडिलांनी त्याला या कलेसाठी प्रोत्साहन अाणि पाठबळ दिले. चित्रे काढत असताना त्याला बोटाने चित्रे काढण्याची संकल्पना सुचली. कला क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ पाहून बोटाने चित्र काढण्याचा सराव करू लागला. तीन ते चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर अखेर तो बोटाने अप्रतिम पोट्रेट साकारू लागला.

घरात कलेचा वारसा नसतानाही महेशने चित्रकलेत नैपुण्य मिळवले आहे. चित्रकलेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला लगेच एका खाजगी शाळेत कलाशिक्षक म्हणून नोकरीदेखील मिळाली. यात त्याने एक वर्ष सेवा देखील बजावली. अचानक जगावर कोरोना नावाचे संकट कोसळले. यातच त्याला त्याची शिक्षकाची नोकरी गमवावी लागली. नोकरी गेली म्हणून महेश निराश किंवा हताश झाला नाही. अंगी असलेल्या कलेला पुन्हा जागृत केले. कोरोनाकाळात तो पुन्हा बोटांनी चित्रे काढतानाचे तीनशेहून अधिक व्हिडिओ सोशल पोस्ट केले. पोट्रेट काढण्यासाठी तो रंगाऐवजी नीळ, शाम्पू आणि फेसपॅक यांचा अत्यंत खुबीने वापर करतोय.

ब्रश

Advertisement -

महेश महापुरुषांची, देवदेवता, बॉलीवूडमधील स्टार्स, सेलिब्रेटी, राजकारणी लोकांचे हुबेहुब पोट्रेट काढू लागला. बोटाने रेखाटलेले अप्रतिम पोट्रेटचे व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले अाणि त्याची ही कला सोशल मिडीयाद्वारे जगभर पसरली.

ही कला पाहून अनेक जण त्याला पोट्रेट काढून देण्यासाठी देश विदेशातून ऑर्डर देत आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, अभिनेता रितेश देशमुख, वरुण धवन, राजकुमार राव यांनी त्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत त्याच्या ‘फिंगर आर्ट’ला कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे अल्पवधीत आपली कला सातासमुद्रपार पोहोचवलेल्या महेशचा आत्मविश्वास वाढला अाहे.

नोकरीतून मिळायचे १० हजार आता कमवतो ५० हजार 

महेशला शिक्षकाच्या नोकरीतून महिन्याकाठी १० हजार रुपये मिळायचे. आज तो ५० हजार रुपये मिळवतोय. कोरोना काळात त्याला त्याच्या कलेने तारले अाहे. अाज त्याची ही कला पाहून त्याला ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण आले आहे. भविष्यात त्याला चित्रकलेतच करिअर करायचे असून लवकरच तो कलाप्रेमीसाठी चित्रकलेचे क्लासेस सुरू करणार अाहे. ही कला देशभर पसरवायचे हाच क्लास सुरु करण्या पाठीमागे हेतू असल्याचे महेशने सांगितले.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here