जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

शाळेमध्ये शिकवले जाणार महेंद्रसिंग धोनीचे चरित्र ,पुस्तकाची पाने झाली व्हायरल!


एमएस धोनीने वर्ष 2007 ते 2016 पर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करताना अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी -20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. महेंद्रसिंग धोनी केवळ क्रिकेट प्रेमींसाठीच नाही तर इतर लोकांसाठीही आदर्श आहे. याच कारणामुळे धोनीची यशोगाथा आता शालेय अभ्यासक्रमातही एका अध्यायात शिकवली जात आहे.

महेंद्रसिंग धोनीचा जो धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे, त्याच हिंदी भाषेतील धड्याची पाने आता इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या पुस्तकात, पानांमध्ये पाहिले जाऊ शकते की धोनीचा जीवन परिचय मुलांना शिकवला जात आहे. माहीचे चरित्र पाठ्यपुस्तकाच्या 7 व्या धड्यात दिले आहे, यात सांगितले की, रांचीतील एका लहान शहराचा मुलगा भारतीय क्रिकेटचा एक चमकणारा तारा कसा बनला.

या धड्यात असेही सांगण्यात आले आहे की, टीम इंडियाचा कर्णधार असताना धोनीने अनेक चमकदार निर्णय घेऊन हरलेले सामनेही जिंकले. याशिवाय धोनीने अनेक नवीन खेळाडू घडवण्याचे काम केले आणि त्यांनस मॅच विनर खेळाडू बनवले.  विराट कोहली, केएल राहुल, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा हे सगळे धोनीचे शिलेदार आहेत.

महेंद्रसिंग धोनीची शानदार क्रिकेट कारकीर्द

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले. त्याने भारतासाठी कसोटीत 90 सामने, एकदिवसीय सामन्यात 350 सामने आणि टी -20 मध्ये 98 सामने खेळले आहेत. धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. त्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.6 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. 98 टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत.

क्रिकेटसोबत करतोय सेंद्रिय शेती

महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 211 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 40.25 च्या उत्कृष्ट सरासरीने 4669 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 136.64 आहे. तसेच, त्याने या लीगमध्ये 23 अर्धशतके केली आहेत.

धोनीने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो आयपीएलमध्ये अजूनही खेळत आहे. लॉकडाऊन दरम्यान तो त्याच्या फार्महाउसवर सेंद्रिय शेती करताना दिसून आला. यासह सध्या तो त्याच्या हेअरस्टाइलच्या लूकमुळे चर्चेत आला आहे.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here