जगभरातील महत्वाच्या बातम्या आणि लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

या राजाने इंग्रजांना आपल्यासमोर भिक मागण्यास मजबूर केले होते, इंग्रजांवर होते त्यांचे करोडोंचे कर्ज..!


भारतीय भूमीवर सत्ता मिळवण्याच्या आकांक्षेने आलेल्या इंग्रजांनी भारतातील अनेक राजाना पराभूत करून त्यांच्यावर कब्जा केला होता. त्यांची सर्व मालमत्ता जप्त करून त्यांना गुलाम बनवले होते .पण भारतीय इतिहासात असाही एक राजा होता ज्याने इंग्रजांना न घाबरता त्यांचा मुकाबला केला.

एकीकडे सर्व राजे इंग्रजांच्या शरण जत असतांना त्यांनी मात्र  इंग्रजांना आपल्यासमोर भीक मागण्यास भाग पाडले.

हा राजा दुसरा तिसरा कोणी नसून दुसरे श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर होते.… ज्यांनी स्वतः इंग्रजांना करोडो रुपयांचे कर्ज देऊन आपले कर्जदार बनवले होते.

इंग्रज

Advertisement -

महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय हे त्यावेळी ‘मध्य भारताचे महाराज’ म्हणून ओळखले जात होते.

ब्रिटिशांच्या रेल्वे प्रकल्पामुळे जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन महाराजा तुकोजीराव होळकर यांनी पहिल्या टप्प्यासाठी इंग्रजांना एक कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या मदतीने इंदूरजवळील तीन रेल्वे स्थानकांना जोडण्याचे काम इंग्रजांनी पूर्ण केले. महाराजा तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जातून इंग्रजांनी ‘खंडवा-इंदूर’ ‘इंदूर-रतलाम-अजमेर’ आणि इंदूर-देवास-उज्जैन या तीन रेल्वेमार्ग सात वर्षांच्या कालावधीत बांधले.

यापैकी ‘खंडवा-इंदूर’ मार्गाला ‘होळकर स्टेट रेल्वे’ असे संबोधले जाते.

महाराजा तुकोजीराव होळकर यांनी इंग्रजांना  4.5 टक्के वार्षिक दराने करोडो रुपये कर्जाची रक्कम उपलब्ध करून दिली. पण राजाची दृष्टी एवढ्यापुरती मर्यादित नव्हती…! एकीकडे कर्जे देऊन जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन त्यांनी रेल्वेच्या उभारणीसाठी इंग्रजांना मोफत जमीनही दिली.

डोंगराळ भाग असल्याने या रस्त्यांवर अथक परिश्रमाने रेल्वे रुळ टाकण्यात आले आणि वाटेत येणाऱ्या नर्मदा नदीवर मोठे पूलही बांधण्यात आले. इंदूरमध्ये चाचणीसाठी आणलेले पहिले वाफेचे इंजिन हत्तींच्या मदतीने खेचून रेल्वे रुळांवर आणण्यासाठी त्यांनीच मोलाची मदत केली होती.

ही घटना भारतीय इतिहासासाठी आणि विशेषतः भारतीय रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते.

इंग्रजांसमोर नागरिकांसह अनेक राजांना असहाय्यपणे हात जोडावे लागले. तेच इंग्रज पैशासाठी भारतीय राजासमोर हात पसरतात  यापेक्षा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट काय असू शकते?


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here