जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

हात-पाय बांधून नदीत उतरलेला हा जादुगार कायमचा गायब झालाय..


 

जादुगार आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनके रहस्य आपल्या सोबत घेऊन जगत असतो. जसकी तो करत असलेल्या जादूची गोष्ट फक्त त्यालाच माहिती असते. तो ती जादू करताना कशी आणि कधी करततो हे आपण अंदाज लावून सुद्धा सांगू शकत नाहीत.

 जादुगार

तुम्ही अमिताभ बचन यांचा तो सीन तर पहिलाच असेल ज्यात अमिताभ यांचे हातपाय बांधलेले असताना ते पाण्यातील बंद संदुकाचे दरवाजे आपल्या जादूने उघडून त्यातून बाहेर पडतो. असाच काहीसा सीन करणे एका खऱ्या जादूगाराच्या जीवावर बेतले होते.

Advertisement -

होय! बंद पेटीतून बाहेर निघण्याची जादू एकदा यशस्वीपने पूर्ण केल्यानंतर ती कामगिरी पुन्हा करण्याच्या नादात या जादुगाराने आपला जीव गमावला होता.  

मांदराके या नावाने ओळखल्या जाणार्‍या जादूगार चांतल लाहिरी (वय 40) यांनी ‘हौदीनी ट्रिक’ नावाच्या प्रसिद्ध जादूची पुनरावृत्ती करण्यासाठी काचेच्या पिंजर्यात स्वतःला बंद केलं.

Kolkata Magician Chanchal Lahiri, Lowered Into River For Live Stunt feared drowned says cops - Weird Stories in Hindi

सहा मजबूत कुलूप असलेले हा पिंजरा क्रेनच्या सहाय्याने नदीच्या मध्यभागी सोडण्यात आला. यावेळी लाहिरीचे डोळे बांधलेले होते आणि हात पायही बांधले होते. यानंतर मात्र  हा जादुगार  गायब झाला आहे. पिंजऱ्यातून बाहेर येण्याची त्याची जादू यशस्वी झाली नाही आणि तो पिंजर्यासह गायब झाला आहे. ही जादू करण्याचा त्याचा मोह त्याच्या जीवावर बेतलाय.

जादूगार हौदिनी द्वारे ओळखल्या जाणार्‍या या युक्तीमध्ये जादूगार स्वत:ला पिंजऱ्यात  बंदिस्त करतो आणि पिंजरा पाण्यात बुडविला जातो.

मग जादूगार त्याच्या कप्प्यातून आपल्या कौशल्याच्या मदतीने या डब्यातून बाहेर पडतो. सुमारे 100 वर्षांपूर्वी हा अनोखा खेळ दाखवून हौदीनी जादूच्या जगात आपले नाव अमर केले होते .

जादुगार

तथापि, मांद्रेके हे प्रथमच करत नव्हते. त्याने हे काम २०१३ मध्ये देखील केले होते आणि कदाचित त्याच आत्मविश्वासाने त्याने पुन्हा ते करण्याचा धोका पत्करला, परंतु कदाचित यावेळी नशिबाने ते मान्य केले नाही.

यावेळी तो पाण्यात उतरला नंतर परत येऊ शकला नाही. नदीत  गेल्यानंतर फार वेळ होऊनही जेव्हा तो परतला नाही तेव्हा पोलिसांना  बोलवण्यात आले त्यांनीही त्याचा फार  शोध घेतला परंतु तो सापडला नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here