जगभरातील महत्वाच्या बातम्या आणि लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

वाचून आच्छर्य वाटेल पण, गेल्या 70 वर्षापासून या गावात कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये..!


जगात आजपर्यंत आपण अनेक रहस्य वाचली असतील पहिली असतील. अनेक वेळा आपण विचार करू शकत नाहीत अश्याही घटना सहज घडून जातात.

आज आम्ही तुम्हाला अशा शहराविषयी सांगणार आहोत जिथे गेल्या सत्तर वर्षापासून कोणीही मरण पावले नाही. ही गोष्ट जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे.

नॉर्वेजियनच्या एका शहराबमध्ये गेल्या 70 वर्षात एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. या शहराचे नाव लाँग इअरबेन आहे. या ठिकाणी कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. याचे कारण जाणून घेतल्यावर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की असे का होते? तर चला जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण..

गाव

Advertisement -

लॉंग इयरबेन येथील प्रशासनाने एक कायदा केला आहे ज्यामुळे येथे एकही लोक मरू शकत नाहीत. येथे मानवाच्या मृत्यूवर बंदी घालण्यात आली आहे.

नॉर्वेच्या उत्तर ध्रुवावर असलेल्या लाँग इअरबेनमध्ये वर्षभर कडाक्याची थंडी असते त्यामुळे येथे मृतांचे मृतदेह कुजत नाहीत. त्यामुळे येथील प्रशासनाने मानवाच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या शहरात गेल्या 70 वर्षात एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्याआधी या शहरात एका आजारग्रस्त माणसाचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे या अनोख्या शहरात ख्रिश्चन धर्माचे अधिक लोक राहतात. 1917 मध्ये येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला जो इन्फ्लूएंझाने पीडित होता. त्या माणसाचा मृतदेह लाँग इअरबेनमध्ये पुरण्यात आला होता, परंतु त्याच्या शरीरात अजूनही इन्फ्लूएंझा विषाणू आहे. यामुळे शहराला कोणत्याही साथीच्या आजारापासून वाचवता यावे यासाठी प्रशासनाने येथे कोणाचाही मृत्यू होण्यास बंदी घातली आहे.

या शहरात सुमारे 2000 लोक राहतात. येथे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला विमानाने दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. जेणेकरून त्याचा मृत्यू तेथे होऊ नये. दुसर्‍या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला की तेथेच त्याचे अंत्यसंस्कारही केले जातात.

गेल्या ७० वर्षापासून सुरु असलेळी ही योजना आजही सुरु आहे त्यामुळे गावात कोणाचाच मृत्यू होत नाही..


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

हा क्रूर सिरीयल किलर फक्त वयात आलेल्या मुलींनाच मारायचा, मृत्यूनंतर करायचा शरीराचे तुकडे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here