जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अभिमानास्पद! दोन्ही डोळ्यांनी अंध लताने केले कळसूबाई शिखर सर!


जिद्द आणि आत्मविश्वास असला आणि कुटुंबीयांची साथ असेल तर कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करता येते. अशावेळी कुठलेही शारीरिक व्यंग सुध्दा आड येत नाही. हीच गोष्ट साध्य करून दाखवली आहे दोन्ही डोळ्याने (अंध) दिव्यांग असलेल्या  परभणीच्या लताने.

लताचा अंध म्हणून तिचा अपमान करावासा वाटत नाही. कारण तिने ते साध्य करून दाखवले आहे जे शरीर स्वस्थ असूनसुद्धा करु शकत नाहीत. तिने चक्क ५४०० मीटरचे कळसुबाई शिखर पार केले आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील असलेल्या देऊळगाव दुधाटे या गावात राहत असलेली लता दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग आहे.

लताचे वडील गावाकडे सुतारकीचा पारंपारिक व्यवसाय करतात तर आई गृहिणी. तिला दोन विवाहित बहिणी तर एक भाऊ आहे. जन्मतःच अंध असल्याने तिला शिक्षण घेण्यास अडचणी येतील या भीतीने मामा प्रभाकर यांच्या आग्रहामुळे नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंग माध्यमिक अंध विद्यालयात पहिली ते आठवीपर्यंत दिव्यांगासाठीचे विशेष शिक्षण घेता आले. त्यानंतर तिने बारावीचे शिक्षण नांदेड ला राहून पूर्ण केले. नंतर पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.

Advertisement -

बीए व आता एमए केले आहे. विशेष म्हणजे लताने अनेक कॉम्प्युटर कोर्ससुद्धा केले आहेत. ती परभणी ते पुणे प्रवास एकटीच करते. इतकेच नाही तर देहरादूनच्या अंध विद्यालयात प्रशिक्षणासाठी गेली तीसुद्धा एकटीच. २०१८ मध्ये लताने ट्रॅकिंग विषयी मैत्रिणीच्या तोंडून बरेचदा ऐकले होते. या मुली करु शकतात मग आपण का नाही करू शकत?म्हणून लताने स्वतःच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. ट्रॅकिंग करायची अशी मनाशी गाठ बांधली. दोन वर्षांपूर्वी तिने प्रतापगड सर केला.

ज्या लताला लहानपणी दोन पाऊल चालायला त्रास होत होता, तिने आता प्रतापगड चढून सामान्यांना तोंडात बोटं घालायला लावत आश्चर्याचा धक्काच दिला. यामुळे लताचा आत्मविश्वास अधिक वाढीस लागल‍ा व तीने पुढे चालून आलेल्या संधीचं सोनं करण्याची संधी सोडली नाही. शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक युवतींना कळसूबाई शिखर करण्याची मोहीम आखून प्रोत्साहित केले जाते. या मोहिमेत लता पांचाळ आपल्या काही मैत्रिणीच्या मार्गदर्शनाखालीच सहभागी झाली होती.

कळसूबाई शिखर

कोणताही नकारात्मक विचार तिच्या मनात आला नाही. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ , ‘कळसुबाई माता की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत इतर दिव्यांगासोबत लताने शिखर चढाईसाठी कूच केली. या मोहिमेत सहभागी दिव्यांग एकमेकांना आधार देत एकमेकांचे मनोबल वाढवत होते. कळसूबाई शिखर सर करताना शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केले.

शारीरिक व मानसिक प्रगल्भतेचा दिला परिचय

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराला गिर्यारोहकाच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहीमांपूर्वी गिर्यारोहक कळसुबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानले जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. पाच ते सहा तासांच्या मोहिमेत लताने कळसुबाई शिखर सर करण्याबरोबर परतीचा प्रवास पूर्ण करत आपल्या शारीरिक व मानसिक प्रगल्भतेचा परिचय करून दिला.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here