जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===


 कॉम्पुटर पेक्षाही तेज आहे या आज्जीची बुद्धी, वयाच्या 55व्या वर्षीही सहज सोडवते प्रश्न..!


 

पंजाबच्या फतेगड साहेब जिल्ह्यातील मनिला गावाची रहिवाशी ५५ वर्षीय कुलवंत कौर ह्या गुगल सर्च इंजिन सारखे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लागलीच देतात. या परिसरातील लोक त्यांना आता गुगल बेबे या नावाने ओळखतात. भारतावर कणी कधी हल्ला केला होता, किती वारस राज्य केले यासारखे असंख्य प्रश्न त्यांना विचारले असता लागलीच उत्तर मिळते. हेचाही तर हिंदू,मुस्लीम,इसाई. बौध इत्यादी धर्माचे सखोल ज्ञान त्यांना आहे.

 

भारतीय इतिहासात आर्य लोकांचे आगमन, भारतावर पहिला हल्ला करणारा मोहमद बिन काजमआणि भरतवर१७ वेळा हल्ला करणारा अलाउद्दीन खिलजी, सिकंदर ओरस, सम्राट अशोक याच्यासारख्या अनेक राज्याचे काम, यांच्या परिवारातील सर्व व्यक्ती अद्दल गुगल बेबेला संपूर्ण माहिती आहे.

Advertisement -

 

गुगल

 

अशा प्रकारे मिळाले धार्मिक ज्ञान

कुलवंत कौर यांचे वडील प्रीतम सिंघ हे लाहोर पाकिस्तानमध्ये पेशाने इंजिनियर होते काही काळाने ते आगरा येथे वास्तव्यास आले. याच ठिकाणी कुलवंत कौर यांचा जन्म झाला. चौथी पर्यंत शाळा शिकल्यावर त्यांनी पारिवारिक कारणांमुळे पुढील शिक्षण पूर्ण केले नाही.

 

बेबे सांगतात कि जेंव्हा त्या आगऱ्याला होत्या त्यावेळी त्यांच्या घरी कपड्याचे व्यापारी राम लाल येत आणि त्यांच्या वडिलासोबत अनेक धार्मिक गोष्ठींवर चर्चा करत. त्यावेळी कुलवंत कौर ह्या सर्व गोष्ठी ध्यानपूर्वक ऐकत त्यातूनच त्यांचे धार्मिक ज्ञान वाढत गेले.

 

अनेक पुस्तकांचे केले वाचन.

गुगल बेबे सांगतात कि, त्यांनी आज पर्यंत हिस्टरी ऑफ इंडिया, हिस्टरी ऑफ पंजाब, डिस्कवरी ऑफ इंडिया, डिस्कवरी ऑफ पंजाब यासोबत धार्मिक अध्ययनाचे लिटरेचर जवळपास २२ वर्षांपर्यंत वाचले आहे. त्यांनी जे पुस्तक एकवेळा वाचले ते त्यांना परत वाचण्याची गरज पडली नाही.

 

गुगल

 

त्यांनी आपल्या घरीह एक लायब्ररी बनवली आहे आणि या लायब्ररीत पत्रकार खुशवंत सिंह, कुलदीप नैय्यर, दीवान वरिंदर नाथ यांची अनेक पुस्तके आहेत.

 

पंजाबी युनिवर्सिटी मध्ये होणार अॅडमीशन.

काही दिवसांपूर्वी बेबे कुलवंत कौर यांची भेट आंतरराष्ट्रीय समाजसेवक एस पी सिंघ ओबेरॉय यांच्याशी झाली होती. ओबेरॉय यांनी गुगल बेबेच्या फोनवरून पंजाबी युनिवर्सिटीच्या अधिकाऱ्यांना फोन केला ई काही प्रश्न विचारण्यास सांगितले, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर बेबेने तुरांतच दिले. ओबेरॉय आता त्यांना या युनिवर्सिटीत धर्म अध्ययनात पी एच डी करण्यास मदत करणार आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here