जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

विकी कौशल घोड्यावर चढण्याआधीचं वाढल्या अडचणी, कतरिना आणि विकी कौशल विरोधात या माणसाने केली तक्रार दाखल..


बॉलीवूडमध्ये सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाबद्दलची.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त कतरिना आणि विकीच्या शाही विवाहसोहळ्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. 7 डिसेंबर ते  9 डिसेंबर या दरम्यान हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

कतरिना

हा शाही लग्नसोहळा राजस्थान (Rajasthan) येथील 700 वर्ष जुन्या किल्ल्यात पार पडणार आहे. यासाठी सवाई मधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. याचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हा लग्नसोहळा सुरूही झाला नाही त्याआधीच कतरिना आणि विकी विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

Advertisement -

जयपूरमधील चौथ माता मंदिराकडे जाणारा रस्ता विकी कतरिनाच्या लग्नासाठी बुक केलेल्या किल्ल्यासमोरून जातो. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. हा रस्ता अडवल्याबद्दल कतरिना, विकी, हॉटेल व्यवस्थापक आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चौथ माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हवाला देत वकील नेत्रबिंदु सिंह जदौन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जिल्हा विधी प्राधिकरणात ही तक्रार दाखल करण्यात आली असून या लग्नसोहळ्यादरम्यान सामाईक मार्ग सुरळीत ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.


हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here