आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

बॉलीवूडची ड्रामा क़्विन कंगना राणावतला मोठा झटका, शीख समुदाय उचलणार हे मोठे पाउल..!


 

अभिनेत्री कंगणा राणावतच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांना कंगनावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

कंगणाच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाईल आणि त्याचवेळी ते या प्रकरणी महाराष्ट्र सचिवालयात गृहमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत, असं मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटलं आहे.

आमचे शिष्टमंडळ आज सकाळी 11 वाजता मुंबई, खार पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनौतच्या चुकीच्या जातीय टिप्पणीबद्दल तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता हे शिष्टमंडळ महाराष्ट्र सचिवालयात जाऊन माननीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असं ट्विट मनजिंदर सिंग सिरसा यांनी केलं आहे.

कंगना राणावत

Advertisement -

कंगणाच्या सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंट्सवर कठोर कारवाई व्हायला हवी. तिला  नुकतीच मिळालेली सुरक्षा आणि पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा. तिच्या अशा कमेंट्स पाहून तिला मेंटल हॉस्पिटल किंवा जेलमध्ये टाकलं जावं, असं मनजिंदर सिंह सिरसा यांनी म्हटलंय.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शीख समुदायातील लोक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कंगणा राणावतच्या मुंबईतील खारमधल्या घरासमोर शीख समुदायाकडून निदर्शने करण्यात आली आहेत. त्यासोबत कंगणाविरोधात नारेबाजी देखील करण्यात आली.

आता शीख समुदायाचे नेते तिच्या विरोधात आणखी कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारील देखील असल्याच बोललं जातंय.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here