आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ads

कोरोनाकाळात रुग्णांच्या मदतीला गाव आले धावून..


 

पाहावे तिकडे केळीच्या बागा अन् रस्त्याच्या बाजूला असलेली नारळाची उंच उंच झाडं. . . लांबपर्यंत दिसणारी उसाची शेती… त्यात लक्ष वेधून घेणारा आर्चीचा बंगला असे ‘सैराट’ चित्रपटातील दृश्य सर्वाना आठवत असेल ना? हेच ते कंदर गाव. आज याच गावाने कोरोना काळात नागरिकांना मदत करत आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या मदतीतून गावात कोव्हिड सेंटर उभे केले आहे.

कोव्हिड सेंटर

करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर कंदर हे पाच हजार लोकसंख्येचे गाव.

उजनी धरणाच्या काठावर वसलेलं गाव केळी उत्पादनात सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर. मराठी सिनेसृष्टीला नवीन ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाचे चित्रीकरणही या गावात झाले होते. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनही सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत. प्रशासनाच्या मदतीला अाता गावे देखील धावून येत आहेत. नुकतेच कंदर या गावाने मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

कोव्हिड सेंटर

गावातील रुग्णाला गावातच रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्याचा निर्णय या गावाने घेतला. या गावातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली तर रुग्णाला उपचारांसाठी अकलूज, सोलापूर, करमाळा किंवा बार्शीला जावे लागे. मात्र सध्याच्या परिस्थितीत तिथे सर्व सुविधा उपलब्ध होतीलच याची शक्यता नाही, म्हणून गावाने पुढाकार घेत गावातच सर्व सुविधा असलेले कोव्हिड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. याला प्रशासनानेही प्रतिसाद दिला. कोरोनाच्या संकटात सर्व हेवेदावे विसरून गावही पुढे आले.

करमाळ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांनी गावाची पाहणी केली. प्रशासनाने तुम्ही पुढाकार घेतल्याला आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर गावकरी कामाला लागले. गावातील तरुणांनी लोकवर्गणी काढली. यासाठी ज्याला जे शक्य होईल ती मदत करु लागले. लोकवर्गणीतून जवळपास सव्वादोन लाख रुपयांच्या आसपास रक्कम जमा झाले. यातून अनेक हातांच्या सहकार्याने कोव्हिड सेंटर उभारले. येथे उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांची नियुक्ती झाली. आज अनेक रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

सरपंच मनिषा भास्करराव भांगे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी, माजी संचालक नवनाथ शिंदे, पत्रकार गणेश जगताप यांच्यासह गावातील तरुण, ग्रामस्थ आणि बचत गट यांच्या सहकार्यने हे कोव्हीड सेंटर सुरु झाले आहे.

गावासाठी मदत करण्याचे हेच ते दिवस 

सरपंच मनिषा भास्कर भांगे यांनी सांगितले की, कोव्हिडच्या साथीमुळे रुग्णांना बेड मिळणे मुश्किल आहे. कंदर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून गावातील कण्वमुनी विद्यालय व ज्यू कॉलेज कंदर येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यासाठी काम सुरू केले.

आज २५ सामान्य बेड व १० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. ज्यामुळे गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळू लागले. आमदार संजयमामा शिंदे यांच्या साखर कारखान्यांकडून दूध, अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या गावासाठी काहीतरी करण्याचे दिवस आहेत. यासाठी गावाने पुढाकार घेतला आहे.

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here