जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

जो रूट भाऊ भलताच सुसाट, इंग्लंडकडून अशी कामगिरी करणारा एकमेव कर्णधार बनलाय..


क्रिकेट सामन्यात नवे विक्रम होत असतात, क्रिकेट रसिकांना ही पर्वणी असते, जे चाहते आहेत, त्यांना सामन्यातील अशा घडामोडी खूप औत्सुक्याच्या असतात. सध्या एडलेड मध्ये सुरू असलेल्या आस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड कसोटी सामन्यात भलेही इंग्लड संघ पराभवाच्या छायेत असेल मात्र कर्णधार ज्यो रूट याने आपल्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

इंग्लंडसाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून आता रूट ने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी त्याने हा विक्रम केला आहे.इंग्लडसाठी सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार म्हणून रूटने आज एलिस्टर कुक या खेळाडूला मागे टाकले.कुकने 59 कसोटी सामने खेळतांना 4844 धावा केल्या होत्या त्याला मागे टाकत आज रूटने 58 कसोटी सामन्यांतच 4859 धावा केल्यात.त्याने 12 शतकं ठोकली आहेत.मायकल ऍथरटन 3815 धावा काढून तिसऱ्या स्थानावर आहे.ग्राहम गुच (3582) आणि अँड्र्यू स्ट्रॉंस (3343) हे देखील आघाडीच्या कर्णधारात आहेत.

इंग्लंड

रूट च्या या विक्रमावर कुक ने अतिशय मोकळी प्रतिक्रिया दिली असून बीटी स्पोर्ट्स शी बोलताना कुक ने सांगितले की, ” आणखी एक विक्रम रूटच्या नावे गेला आहे.आता माझ्याजवळ अधिक नाहीत.तो नक्कीच इंग्लडचा महान फलंदाज म्हणून हळूहळू स्थान मिळवेल”.

Advertisement -

यावर्षी कसोटी सामन्यात रूट ने 1630 धावा केल्या आहेत.एका कॅलेंडर वर्षात कसोटी सामन्यात 1600 हुन अधिक धावा करणाऱ्या आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ नंतर रूटच्या नावे हा विक्रम आहे.

विशेष म्हणजे एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील स्मिथच्या नावे आहे, त्याने 2008 मध्ये 1656 धावा केल्या होत्या.आता स्मिथला मागे टाकण्यासाठी रुटला 27 धावा हव्यात. यात कर्णधार म्हणून पहिल्या क्रमांकावर पाक खेळाडू मोहम्मद युसूफ आहे त्याने 11 कसोटी सामन्यात 1788 धावा 2006 मध्ये केलेल्या आहेत.वेस्ट इंडिजचा विव्ह रिचर्ड दुसऱ्या स्थानी आहे, त्याने 1976 मध्ये 11 कसोटी सामन्यात 1710 धावा केलेल्या आहेत.


=

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here