जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

युनिक कला: पेन्सिलच्या टोकावरील लिडवर शिल्पाकृती कोरणारा ‘जीवन’


 

सोलापूर : बालपणी प्रत्येकाचे पेन्सिल्सशी मैत्रिचे घट्ट नाते असते. एरव्ही या पेन्सिलचा वापर मुळाक्षरे काढण्यासाठी अथवा चित्र रेखाटण्यासाठी वापर करतात हे आपण पाहिलेच असेल. याच ०.५ एमएमच्या ग्रॅफाइट पेन्सिलच्या टोकावरील लीडवर एक कलाकार विविध प्रकारच्या ‘युनिक’ कलाकृती साकारतोय. पण तेही कुठल्याही भिंगाचा वापर न करता. सहा ते सात तासात वेळेत सतत नवनवीन कलाकृतींना जन्म देतोय. तसेच या कलाकृतीच्या माध्यमातून तो सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करतोय. जीवन जाधव असे या कलाकाराचं नाव आहे.

पेशाने अभियंता असलेला ३१ वर्षीय जीवन जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्याचा रहिवासी. सध्या तो पुण्यात आयटी इंजिनिअर म्हणून काम करतोय. कामाच्या व्यापाने काही दिवस त्यांची ही कला मागे पडली. पण पुढे त्याने या कलेला आपलेसे केले. आपल्या कामाच्या व्यापातून मिळालेला वेळ हा आपल्या छंदासाठी देऊ लागला. जीवन ला लहानपणापासून चित्रकलेची आवड. चित्रे काढत असताना पुढे तो खडूवर कलाकृती साकारु लागला. यातून पुढे ग्रॅफाईटची पेन्सिल अथवा लीड पेन्सिल वर शिल्पाकृती साकारण्याची संकल्पना सुचली. कालांतराने तो या कारपेंटर पेन्सिलच्या टोकावरील लीडवर सर्जिकल ब्लेडचा वापर करून सूक्ष्म शिल्पाकृती कोरू लागला.

पेन्सिल

Advertisement -

जीवन ने कलेचे कुठलेही प्रशिक्षण न घेता केवळ छंदापोटी ही कला आत्मसात केली. या शिल्पाकृती तयार करण्याचा त्याला पुढे छंदच जडला. तो या कलेत नैपुण्य झाला. प्रसंगी अनुरूप, दिनविशेष, सण समारंभानुसार तो शिल्पाकृती साकारू लागला. लोकही त्याच्या कलेला दाद देताहेत. सोशल मिडीयावर तो कलकृतीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत राहायचा. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याची ही ‘पेन्सिल कार्व्हिंग आर्ट’ सातासमुद्रापार पोहोचली. त्यांच्या या अद्वितीय छंदाचे रूपांतर आता व्यवसायात झाले आहे. तयार केलेल्या शिल्पाकृतीला दुरदुरून मागणी येत आहे. त्याच्या या कलेसाठी आई सुमन आणि वडील रामदास हे प्रोत्साहन देतात.

गिनीज बुकमध्ये झाली नोंद

भारतीय संस्कृती, विविध देवदेवता, महापुरुष, समाजसुधारक, खेळाडू, राजकीय नेते यांच्या शिल्पाकृती जीवनने साकारल्या आहेत. यासह त्याने एकाच पेन्सिल वर इंग्रजीतील ए टू झेड अक्षरे काढली आहेत. पेन्सिलच्या शिसावर ९३ कडीची साखळी तयार करण्याचा विक्रम देखील तयार केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. जगातील सर्वात छोटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती काढण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. फेसबुकने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय शिल्पाकृती स्पर्धेत त्याला बक्षीस मिळाले आहे.

=

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here