जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

पोलिसाची नोकरी सोडून सुरू केली बटाटा शेती, आता दरवर्षी कमावतोय 3.5 कोटी रुपये


“पार्थीभाई पूर्वी गुजरात पोलिसात सेवेत होते, पण शेतीवरील प्रेम आणि काहीतरी वेगळे करून पुढे जाण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे त्यांनी सुमारे 18 वर्षांपूर्वी आपली सरकारी नोकरी सोडली. माहितीनुसार 1981 मध्ये गुजरात पोलिसात एसआय पदावर पार्थिभाईंची निवड झाली होती..

या व्यक्तीचं नाव आहे पार्थिभाई जेठाभाई चौधरी,जे गुजरातच्या बनासकांठामधील दांतिवाडा येथील रहिवासी आहेत.
पार्थीभाई पूर्वी गुजरात पोलिसात सेवेत होते, परंतु शेतीची आवड आणि काहीतरी वेगळे करून पुढे जाण्याची त्यांची इच्छा यामुळे त्यांनी सुमारे 18 वर्षांपूर्वी आपली सरकारी नोकरी सोडली.

त्यांच्या या प्रवासाची सुरुवात अशा प्रकारे झाली की, पोलीस नोकरीच्या दरम्यान, पार्थीभाईंना एका परदेशी कंपनीकडून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली जिथे त्यांना दर्जेदार बटाट्यांच्या उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. इथेच पार्थीभाईंनी बटाटा उत्पादनाशी संबंधित सर्व तंत्र शिकले आणि त्यानंतर बटाटा उत्पादन घ्यायला सुरू केले.

पार्थीभाईंसाठी बटाटा उत्पादनाची सुरुवात गुंतागुंतीची होती, कारण त्यांना पिकासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत होते, पण त्यावर उपाय म्हणून पार्थीभाईंनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. या तंत्राद्वारे, पिकाला थेंबामध्ये पाणी पुरवले जाते, ज्यामुळे पिकाला कमीत कमी पाण्याच्या वापरासह आवश्यक पाणी सहज मिळते.
आज पार्थीभाई आपल्या 87 एकर जमिनीवर बटाट्यांची लागवड करत आहेत, जिथे ते प्रति हेक्टर सुमारे 1200 किलो बटाटे उत्पादन घेतात. या बटाट्यांची गुणवत्ता साधारणपणे चिप्स उत्पादनासाठी योग्य असते. पार्थीभाई सुरुवातीला मेकॅन कंपनीला बटाटे पुरवत असत, मात्र आता ते बालाजी वेफर्स या स्वदेशी कंपनीला चिप्स पुरवत आहेत.

Advertisement -

बटाटा

एवढ्या मोठ्या प्रमाणावर बटाट्याचे उत्पादन करणारे आणि कोट्यवधींचा व्यवसाय करणारे पार्थीभाई आपल्याकुटुंबासाठीही पुरेसा वेळ काढतात. बटाटे साधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीला लावले जातात आणि डिसेंबरपर्यंत हे पीक तयार होते. यानंतर, पार्थीभाई आपले बटाटे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात, तेथून मग मागणीनुसार बटाटे पुरवले जातात.

आज दररोज 15 पेक्षा जास्त लोक पार्थिभाई यांच्या शेतावर काम करत आहेत. तर दरवर्षी पार्थीभाई सुमारे 3.5 कोटी रुपयांचे बटाटे विकतात. बटाट्याव्यतिरिक्त, पार्थीभाई एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात बाजरी, शेंगदाणे आणि टरबूज इत्यादी पिके देखील घेतात.

पार्थीभाईंनी हेक्टरी बटाटा उत्पादन घेत हेक्टरी उत्पादनाचा जागतिक विक्रम केला आहे, जिथे त्यांनी 2011-12 मध्ये 87 मेट्रिक टन बटाट्याचे उत्पादन केले. आज बनासकथा हे बटाटा उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे, जेथे देशातील बटाटा उत्पादनापैकी सुमारे 6 टक्के उत्पादन घेतले जाते आणि 1 लाखाहून अधिक शेतकरी या कामात गुंतलेले आहेत.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here