जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर ६ मार्च रोजी आपला २४ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

यावेळी जान्हवीने तिच्या वाढदिवशी कोणतीही सुट्टी घेतली नाही, परंतु ती तिच्या वाढदिवशी तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवीचा वाढदिवस तिच्या चित्रपटाच्या टीमने ‘गुड लक जेरी’ च्या सेटवर साजरा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावरही समोर आले आहेत.

जान्हवी कपूर

 

व्हायरल होत असलेल्या चित्रांमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर  साध्या कपड्यांमध्ये आपल्या मित्रांसह मस्ती करताना दिसत आहे.

जान्हवीने मात्र आपला वाढदिवस आपल्या कुटूंबियांसह साजरा केला नाही. वास्तविक पाहता जान्हवी तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि अशा परिस्थितीत तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी जाण्याची सुट्टीही घेतली नव्हती.

 

जान्हवी कपूर

अशा परिस्थितीत चित्रपटाच्या टीमने जान्हवी कपूर साठी सेटवर एक सरप्राईज तयार केले. सेटवर सुंदर सजावट करुन टीमने जान्हवीला चकित केले. यावेळी जान्हवीच्या चित्रपताच्या टीमचे सदस्यही खूप खूष झाले. जान्हवीनेही आपला वाढदिवस अगदी साध्या लूकमध्ये साजरा केला आणि टीमबरोबर केक कापला.

 

जान्हवीने एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या क्रू मेंबरने तिला वाढदिवसाचा केक आणला होता. जान्हवीने याबद्दल त्यांचे आभार मानले. जान्हवीच्या स्टायलिस्टने जान्हवीची छायाचित्रेही शेअर केली आहेत ज्यात ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये केक कापताना दिसत आहे. जान्हवीच्या या चित्रांवर चाहते खूप प्रेम करीत आहेत.

 

कामाबद्दल बोलताना सांगायचे तर जान्हवीने करिअरची सुरवात करण जोहरच्या धडक या चित्रपटापासून केली. या चित्रपटात जान्हवीची भूमिका प्रेक्षकांना आवडली. जान्हवी ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटात दिसली आहे. आता जान्हवी ‘रुही’ चित्रपटामधून प्रेक्षकांना विनोदी आणि भयपटांचा डोस देण्यास तयार आहे. ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

 

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here