जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

रुहीनंतर अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार या मोठ्या सिनेमात,सोबत असेल हा स्टार अभिनेता..!


बॉलिवूड हॉरर-कॉमेडी ‘रुही’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर जान्हवी कपूर आणि राजकुमार राव पुन्हा एकत्र दिसणार आहेत. ताज्या बातमीनुसार, धर्मा प्रॉडक्शनने या दोघांबाबत ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटाचे दिग्दर्शक शरण शर्मा यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हे दोघे लवकरच त्यांच्या नवीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकतील.

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव क्रिकेटपटूंच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पिंकविला  मधील एका रिपोर्टनुसार, शरण शर्मा लवकरच आपला पुढचा चित्रपट सुरू करणार आहे, ज्यात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत. दोघेही या चित्रपटात क्रिकेटपटूंची भूमिका साकारताना दिसतील. दोन्ही कलाकार या चित्रपटासाठी क्रिकेट प्रशिक्षण घेतील.

जान्हवी कपूर

Advertisement -

चित्रपटाची कथा काल्पनिक असेल, ज्यात भावनांना उधाण येईल. अहवालानुसार, या वर्षाच्या अखेरीस त्याचे शूटिंग सुरू होईल. चित्रपटाचे शीर्षक अद्याप उघड झालेले नाही, पण कळले आहे की करण जोहर याची निर्मिती करणार आहे.

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आगामी चित्रपट

आता जान्हवी आणि रखुमारच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर जान्हवीकडे याशीशिवाय इतर अनेक चित्रपट आहेत, ज्याचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ती या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. जान्हवी आगामी ‘हेलन’ चित्रपटात दिसणार आहे. तिचे वडील बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मात्र, ती सध्या करण जोहरच्या निर्मितीतील ‘दोस्ताना 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राजकुमार राव बद्दल बोलायचे झाले तर तो ‘हम दो हमरे दो’ आणि ‘बधाई दो’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल ‘बधाई हो’ चा सिक्वेल मध्ये दिसणार आहे.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here